पोलीस कॉन्स्टेबलने सांगितले, 'पत्नी कडी काढत नव्हती, त्यावेळी दरवाजा तोडला आणि समोर पाहून धक्काच बसला' !

दिल्लीत (Delhi)एक धक्कादायक घटना घडली.  

Updated: Apr 2, 2021, 09:56 AM IST
पोलीस कॉन्स्टेबलने सांगितले, 'पत्नी कडी काढत नव्हती, त्यावेळी दरवाजा तोडला आणि समोर पाहून धक्काच बसला' ! title=

मुंबई : देशाची राजधानी दिल्लीत (Delhi)एक धक्कादायक घटना घडली. दिल्ली पोलिस (Delhi Police) दलातील एका कॉन्स्टेबलच्या पत्नीने फंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. (Delhi Police Constable's Wife Suicide).हैराण करणारी गोष्ट म्हणजे तिने आपल्या दोन लहान मुलांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने स्वत: पंख्याला लटकवून आपले जीवन संपवले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. (Delhi Police Constable Wife Suicide)

पोलीस पत्नीची चिठ्ठी

 दिल्लीतील (Delhi) घिटोरीनी परिसरात ही घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. दिल्ली पोलिसांना (Delhi Police) याबाबत माहिती मिळाली, त्यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी सापडली. मात्र, या चिठ्ठीबाबत पोलिसांकडून अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

त्या रात्री काय झाले?

 वसंत विहार ठाण्यामध्ये तैनात कॉन्स्टेबल सुशील याने सांगितले, घराचा दरवाजा आतून बंद होता. मात्र, दरवाजा ठोकूनही पत्नी दरवाजा उघडत नव्हती. त्याचवेळी वसंत कुंज दक्षिण ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि  पत्नी कडी काढत नव्हती, त्यावेळी दरवाजा तोडला आणि समोर पाहून धक्काच बसला'. दरवाजा बाजुला केल्यानंतर सुशीलची पत्नी राजेश ही पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसली.  (Delhi Police Constable's Wife Suicide) 

बाथरुममध्ये जखमी बाळ 

कॉन्स्टेबल सुशील याला दोन मुल आहेत. एक तीन वर्षांचा समर्थ आणि तीन महिन्याचा श्रेष्ठ बाथरुममध्ये जखमी अवस्थेत पडून होते. यातील श्रेष्ठ याची स्थिती नाजुक आहे.

प्राथमिक चौकशीत पुढे आली ही बाब

पोलीस तपासात पुढे आले की, पोलीस काँस्टेबल सुशील याची पत्नी राजेश हिने आपल्या मुलांचा हत्या करण्यात प्रयत्न केला. त्यानंतर तिने पंख्याला लटकून गळफास घेतला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. अधिक तपास सुरु केला आहे. दरम्यान, पोलीस काँस्टेबल सुशील याचे लग्न 7 वर्षांपूर्वी 2014 मध्ये झाले. सुरुवातीच्या चौकशीत पुढे आले आहे की, सुशील याचे पत्नीशी भांडण झाले होते.