राहुल गांधी यांनी यांचा पत्ता कापला, कमिटीत नवे चेहरे

काँग्रेस वर्किंग कमेटीत २३ सदस्य, १९ स्थायी निमंत्रित सदस्य आणि ९ आमंत्रित सदस्य असणार आहेत. राहुल गांधी यांनी २२ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीची बैठक बोलावली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 17, 2018, 10:56 PM IST
राहुल गांधी यांनी यांचा पत्ता कापला, कमिटीत नवे चेहरे title=

नवी दिल्ली : गतवर्षी डिसेंबरमध्ये काँग्रेस अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सात महिन्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या टीमची घोषणा केलेय. यात ज्येष्ठ नेत्यांना डच्चू देताना नव्या चेहऱ्यांना संधी दिलेय. यात माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू जनार्दन द्विवेदी आणि दिग्गी म्हणून परिचित असलेले  दिग्विजय सिंग यांचा पत्ता कापलाय. तसेच अनेक बड्या नेत्यांना टीममध्ये स्थान देण्यात आलेले नाही. दरम्यान, राहुल गांधी यांच्या टीमची पहिली बैठक २२ जुलै रोजी दिल्लीत होत आहे.

राहुल गांधी काँग्रेस वर्किंग कमिटीची स्थापना केली आहे. ही टीम बनविण्यासाठी राहुल गांधी यांनी ७ महिन्यांचा कालावधी घेतलाय. या कमिटीत पहिल्यांदा रणदीप सिंग सुरजेवाला यांना स्थान देण्यात आले आहे. सुरजेवाला काँग्रेसमध्ये सर्वाधिक भाग्यशाली राहिले आहेत. राहुल गांधी यांच्या टीममध्ये ज्या नव्या नेत्यांना संधी मिळालेय यात केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत, आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र गौरव गौगाई यांचा समावेश आहे.

दिग्विजय सिंग यांचा पत्ता कापताना मध्य प्रदेशचे ज्योतिरादित्य सिंधिया यांना टीममध्ये सहभागी करण्यात आलेय. कमलनाथ यांना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेय. त्यामुळे त्यांना राहुल टीममध्ये स्थान देण्यात आलेले नाही. १० वर्षे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले दिग्विजय सिंग यांना कमिटीत स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे मध्य प्रदेशात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया काम पाहणार आहेत.

तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार, सी पी जोशी आणि मोहन प्रकाश यांना काँग्रेस कमिटीत स्थान देण्यात आलेले नाही. राजस्थानमध्ये अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांना संधी मिळालेय. त्यांनी दाखविलेल्या कामातून त्यांना तेथे संधी मिळाली आहे. तर सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणार जनार्दन द्विवेदी यांना डच्चू देण्यात आलाय. ज्यावेळी राहुल गांधी यांना अध्यक्ष बनविले गेले त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जनार्दन द्विवेदी करत होते. ते अनेक वर्ष काँग्रेसच्या केंद्र स्थानी राहिले होते.

राहुल गांधी यांची नवी टीम

राहुल गांधी यांची ५१ जणांची टीम, २२ जुलैला पहिली बैठक

 काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) स्थापना केली. राहुल गांधी यांनी सीडब्ल्यूसीमधील अनुभवी आणि तरुण नेत्यांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष संघटना सचिव अशोक गेहलोत यांनी याबाबत घोषणा केली आहे.  सीडब्ल्यूसी २३  सदस्य, १९ स्थायी निमंत्रित आणि नऊ आमंत्रित समावेश आहे. राहुल गांधी यांनी २२  जुलै रोजी डब्ल्यूसीची पहिली बैठक बोलावली आहे, अशी माहिती गेहलोत यांनी दिली.

राहुल गांधी यांची ५१ जणांची टीम, २२ जुलैला पहिली बैठक

सीडब्ल्यूसी सदस्य पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाचे कोषाध्यक्ष मोतीलाल व्होरा, अशोक गेहलोत, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, ए के अँटनी, अहमद पटेल, अंबिका सोनी आणि मंत्री यांनी ओमेन चंडी यांना संधी देण्यात आली आहे.

तसेच माजी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री सिद्धरमैया, माजी मुख्यमंत्री हरीश रावत, नेते, आनंद शर्मा, कुमारी शैलजा, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, कुमार वेणुगोपाल, दीपक बाबरिया, ताम्रध्वज साहू, रघुवीर मीना आणि गैखनगम यांचा समावेश आहे. सीडब्ल्यूसीमध्ये स्थायी सदस्यांत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम,  ज्योतिरादित्य सिंधिया, बाळासाहेब थोरात, तारिक हमीद कारा, पीसी चाको, जितेंद्र सिंग, आर.पी. सिंग, पी.एल. पुनिया, रणदीप सुरजेवाला, आशा कुमारी, रजनी पाटील  रामचंद्र खूंटिया, अनुग्रह नारायण सिंग, राजीव सातव, शक्तिसिंह गोहिल, गौरव गोगोई आणि ई. चेल्लकुमार यांचा सहभाग आहे.

'टीम राहुल'मध्ये महाराष्ट्रातल्या या नेत्यांना संधी