Rahul Gandhi Priyanka Gandhi : सप्टेंबर महिन्यापासून सुरु झालेल्या काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'मध्ये (Bharat jodo yatra) बरेच पैलू पाहायला मिळाले. राज्यांच्या सीमा ओलांडता ओलांडता या यात्रेमध्ये त्या त्या राज्याची, प्रांताची झलकही पाहायला मिळाली. कन्याकुमारीपासून (Kanyakumari) म्हणजेच देशाच्या (South india) दक्षिणेकडील टोकापासून सुरु झालेला हा प्रवास आता उत्तरेच्या दिशेनं सरसावत आहे. सध्या ही यात्रा उत्तर प्रदेशमध्ये असून, साधारण 9 दिवसांच्या विश्रांतीनंतर ही यात्रा पुन्हा सुरु झाली. गाझियाबादमध्ये (Gaziabad) या यात्रेचं स्वागत खुद्द राहुल गांधी यांच्या बहिणीनं केलं. यावेळी नेमकं काय घडलं याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (congress bharat jodo yatra Rahul gandhi shares best bond with sister Priyanka Gandhi )
गाझियाबादमध्ये प्रियंका गांधी यांनी या यात्रेचं स्वागत केलं आणि भावाला पाहून त्यांना प्रचंड आनंद झाला. सोशल मीडियावर यावेळचे काही फोटोसुद्धा व्हायरल झाले. जिथं ही बहीण- भावाची जोडी एकमेकांसोबत गप्पा मारताना एकमेकांची खोडही काढताना दिसत आहे. एक मोठा भाऊ ज्याप्रमाणं लहान बहिणीची काळजी घेतो, तिचे लाड करतो अगदी तसंच राहुल गांधीसुद्धा करताना दिसले. यावेळी ते राजकीय नेत्याहून जास्त एक भाऊ म्हणूनच सर्वांसमक्ष आले. (Rahul Gandhi Priyanka Gandhi Viral Video)
माझा भाऊ एक योद्धा आहे...
यावेळी प्रियंका यांनी राहुल गांधी यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी मनोगतही व्यक्त केलं. 'ओ मेरे बडे भाई.... इधर देखो' असं त्या राहुल गांधी यांचं लक्ष वेधत म्हणाल्या. भावाला हाक मारत आपल्याला सर्वाधिक अभिमान त्याचाच वाटतो या शब्दांत त्यांनी राहुल गांधी यांचं कौतुक केलं.
— Congress (@INCIndia) January 3, 2023
'यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जोर लावला, सत्तेच्या चाव्या फिरल्या, सरकारनं कोट्यवधी रुपये खर्च केले पण ते (राहुल गांधी) मात्र मागे फिरले नाहीत. त्याच्यामागे अनेक यंत्रणा लावत त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला पण तरीही ते घाबरले नाहीत... योद्धा आहे माझा भाऊ', असं त्या म्हणाल्या.
एका योद्ध्याप्रमाणं पुढे जाणाऱ्या माझ्या भावानं एक प्रेमाचं दुकान सुरु केलंय आणि हे दुकान प्रत्येक गल्लीबोळात, देशाच्या कानाकोपऱ्यात असायला हवं नाहीतर, घृणेचं राजकारण पुढे जाईल आणि नागरिकांचं कधीच समाधान होणार नाही, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. अदानी आणि अंबानी यांनी (Adani and Ambani) यांनी सर्वकाही विकत घेतलं पण, ते माझ्या भावाला मात्र विकत घेऊ शकले नाहीत. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही ते शक्य नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.