Akshay Trituya 2021 | अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने खरेदीचे नियोजन करणार असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. कारण पुढच्या एका वर्षात यावर चांगला परतावा मिळू शकतो. यावर्षी सोन्याच्या दरांमध्ये उतार - चढाव बघायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच जागतिक अर्थकारणाचा कल पाहता पुढच्या महिन्यापासून सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. सराफा बाजारांमध्ये सोन्याचा भाव सध्या 48 हजार रुपये प्रतितोळे इतका सुरू आहे. बाजाराचे जाणकार सांगतात की, एका वर्षात सोन्याचे दर 60 हजारांवर जाऊ शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना एका वर्षात जबरजस्त परतावा मिळू शकतो.
मोतीलाल ओसवाल फाइनाशिअल सर्विसेसच्या अहवालानुसार, 2021 मध्ये सोन्याच्या दरांमध्ये अनेकदा उतार चढ पहायला मिळाली. अनेक देशांमध्ये लसींना मिळालेली परवानगी, अमेरिकी निवडणूका, फार्मा कंपन्यांचे शेअर्स, डॉलरच्या किंमती कमी जास्त होणे आदीं कारणं सोन्याच्या दरात चढ उतार होण्यास कारणीभूत आहेत.
केडिया कमोडिटीच्या डायरेक्टर अजय केडिया यांच्या मतानुसार, सोन्यात येत्या काळात तेजी येण्याचे संकेत आहेत. जगभरातील कमी व्याजदरे, कोरोनाच्या बाबतीतील अनिश्चितता, अधिक लिक्विडिटीमुळे महागाईत वाढ, ईटीएफमध्ये खरेदी, केंद्रीय बँकांची सोन्यात खरेदी, डॉलरच्या किंमतीत घसरण, देशांमध्ये जिओ - पॉलिटिकल तणाव इत्यादी कारणांमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पुढच्या वर्षी अक्षय तृतीयेपर्यंत सोन्याच्या किंमती 60 हजार प्रतितोळे पर्यंत पोहचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.