नो टेन्शन ! कोविड लसीबाबत सरकारची मोठी घोषणा, इतके कोटींचे डोस उपलब्ध होणार

देशात कोरोनाचे संकट (Coronavirus in India) वाढत असताना कोविड लसीचा पुरवठा कमी होत आहे. (COVID Vaccine)  त्यामळे अनेक ठिकाणी लस अभावी लसीकरण रखडलेले आहे. 

Updated: May 14, 2021, 08:07 AM IST
नो टेन्शन ! कोविड लसीबाबत सरकारची मोठी घोषणा, इतके कोटींचे डोस उपलब्ध होणार title=
संग्रहित फोटो

मुंबई : देशात कोरोनाचे संकट (Coronavirus in India) वाढत असताना कोविड लसीचा पुरवठा कमी होत आहे. (COVID Vaccine)  त्यामळे अनेक ठिकाणी लस अभावी लसीकरण रखडलेले आहे. 18+ लोकांच्या लसीकरणाची घोषणा करण्यात आली, मात्र डोस नसल्याने अनेक ठिकाणी या लोकांचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. तर 45 वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरु आहे. देशात आणि राज्यात लसीचा तुटवडा पडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, येत्या तीन ते सात महिन्याात हा तुटवडा भरुन निघणार आहे. त्यामुळे आता घोषणा केल्यापैकी सगळ्यांसाठी लस उपलब्ध होईल, असे संकेत सरकारने दिले आहेत.

येत्या 3-7 महिन्यांत देशात 200 कोटींपेक्षा जास्त डोस असतील, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. कोणत्या लसीचा किती पुरवठा होईल, हेही स्पष्ट करण्यात आले आहे. हे विधान महत्त्वपूर्ण आहे, कारण देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे आणि बहुतेक राज्यांमध्ये लसीचा अभाव आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 13 मे रोजी एक महत्त्वपूर्ण आकडेवारी शेअर करताना सांगितले की, ऑगस्ट ते डिसेंबर 2021 दरम्यान देशात 216 कोटी लस डोस उपलब्ध होतील. म्हणजेच पुढील 3-7 महिन्यांत देशात पुरेशा लस उपलब्ध होतील. मंत्रालयाने म्हटले आहे की, ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान भारतात रशियन स्पुटनिकचे सुमारे 15.6 दशलक्ष डोस असतील.

देशात तिसर्‍या टप्प्यातील कोविड लसीकरण अंतर्गत 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जात आहे. सध्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, ऑक्सफोर्ड एस्ट्रोजेन्काची कोविशील्‍ड आणि रशियाची स्पुटनिक या तीन लस उपलब्ध होणार आहेत. कोविशील्‍डचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आणि स्पुटनिक येथे डॉ. रेड्डीज मार्केटिंग करीत आहे. येत्या काही दिवसांत देशात आणखी काही लस उपलब्ध होणार असल्याचेही मंत्रालयाचे म्हणणे आहे. त्यापैकी, नेजल व्हॅक्सिन वर काम चालू आहे.

modi govt big data on covid vaccine Health Ministry says 216 cr vaccine doses will be available in india from Aug to December 2021

10 कोटी नेजल व्हॅक्सिन 

मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत  कोविशील्‍डचे 75 कोटी डोस आणि कोवाक्सिनचे 55 कोटी डोस प्राप्त होतील. त्याशिवाय ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान देशात रशियन स्पुटनिकचे सुमारे 15.6 कोटी डोस उपलब्ध असतील. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या कालावधीत बायो-ई सब्यूनिट लस, झेडस कॅडिला डीएनए लस 5 कोटी, सीरमची नोव्हाव्हॅक्स 20 कोटी, भारत बायोटेची नेजल लस 10 कोटी आणि जिनिव्हा एमआरएनए लस 6 कोटी डोस प्राप्त होईल. या व्यतिरिक्त इतरही अनेक लस उपलब्ध असतील.