सलमान खान मध्य प्रदेशातील पर्यटनास देणार प्रोत्साहन

अभिनेता सलमान खान आपला राजकीय प्रवास सुरू करणार असल्याची चर्चा आहे.

Updated: Mar 7, 2019, 08:50 PM IST
सलमान खान मध्य प्रदेशातील पर्यटनास देणार प्रोत्साहन  title=

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खान आपला राजकीय प्रवास सुरू करणार असल्याची चर्चा आहे. त्याला मध्य प्रदेशातून कॉंग्रेस पक्षातर्फे त्याला लोकसभा निवडणुकीची तिकिट मिळण्याची शक्यता आहे. भोपाळचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी याचे संकेत दिले आहे. पण याबद्दल उघडपणे काही सांगितले नाही. सलमान एप्रिलमध्ये 18 दिवस मध्य प्रदेशमध्ये राहणार आहे. 

Image result for cm kamalnath zee news

भोपाळमध्ये आज मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांनी सलमान प्रकरणावर भाष्य केले. राजकारणा व्यतिरिक्त काहीतरी सांगू इच्छितो असे ते म्हणाले. माझे सलमान खानशी बोलणे झाले आहे. तो 1 ते 18 एप्रिल पर्यंत खासदार राहील. मध्य प्रदेशमध्ये सलमानने योगदान देण्याची आम्ही त्याला विनंती केल्याचे ते म्हणाले. संस्कृती आणि पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्यासोबत बोलणी झाल्याचे ते म्हणाले. 

Image result for salman khan dna

मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या या वक्तव्यानंतर सलमान खान मध्य प्रदेशहून निवडणुक लढवणार असल्याच्या चर्चा वेगाने होऊ लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होईल. अशावेळी सलमान कोणत्या सरकारच्या योजनेच्या प्रचारासाठी येऊ शकणार नाही. त्यामुळे इथून तो लोकसभा निवडणूक लढवणार नाही हे तर निश्चित आहे. पण माध्यमांनी मुख्यमंत्र्यांना सलमान खान निवडणूक लढवणार का ? हा प्रश्न विचारला. पण कोणतेही उत्तर न देता ते तिथून निघून गेले.