Curd Or Yogurt: तुम्हाला दही खायला आवडतं नाही, मग Yogurt कधी ट्राय केलं आहे का?

पण योगर्ट म्हणजे दही ज्यांना वाटतं असेल तर थांबा, प्रसिद्ध कुणाल कपूर (Kunal Kapur) यांनी या दोघांमधील फरक समजून सांगितला आहे. 

Updated: Oct 2, 2022, 02:59 PM IST
Curd Or Yogurt: तुम्हाला दही खायला आवडतं नाही, मग Yogurt कधी ट्राय केलं आहे का? title=
What the Difference between Curd and Yogurt Kunal Kapur nmp

Curd Or Yogurt : अनेक जण दही म्हटलं की, नाक मुरडतात. दही (Dahi) खायला अनेकांना आवडतं नाही. ज्या लोकांना दूध आणि साय खाल्ल्या आवडतं नाही. अशा लोकांना दही खायला आवडतं नाही. पण दही हे आरोग्यासाठी खूप उत्तम मानलं जातं. रोज दुपारच्या जेवण्यात एक वाटी दही खायला पाहिजे, असं तज्ज्ञ सांगतात. मार्केटमध्ये दहीला पर्याय म्हणून योगर्ट आलं आहे. वेगवेगळ्या चवीचे योगर्ट अनेकांना खायला आवडतं. 

पण योगर्ट म्हणजे दही ज्यांना वाटतं असेल तर थांबा, प्रसिद्ध कुणाल कपूर (Kunal Kapur) यांनी या दोघांमधील फरक समजून सांगितला आहे. अनेकांना वाटतं योगर्ट म्हणजे दही. तर थांबा जर तुम्हालाही असं वाटतं असेल तर आज आम्ही तुमचं गैरसमज दूर करणार आहोत. (What the Difference between Curd and Yogurt Kunal Kapur nmp)

योगर्ट आणि दही हे जरी डेअरी प्रोडक्ट (Dairy products) असले तरी हे दोन वेगवेगळे पदार्थ आहे. त्यांची चव जरी सारखी असली तरी हे दुधापासून बनवण्यात आलेले दोन वेगळे पदार्थ आहे. अगदी या दोघांची बनविण्याची पद्धतसुद्धा भिन्न आहे. 

दह्याला इंग्रजीत Curd असं म्हटलं जातं. तर Yogurt हा शब्द एका तुर्की (Turkey) मधून आला. भारतीय संस्कृतीत दह्याशिवाय दुपारं जेवण पूर्ण होत नाही. पण अनेकांना दही आवडतं नाही. अशा लोकांसाठी Yogurt हा पर्याय गेल्या काही वर्षांमध्ये पुढे आला. Yogurtचं अजून एक वैशिष्टं म्हणजे हे वेगवेगळ्या फ्लेव्हर्समध्ये मिळतं. त्यामुळे ज्यांना दही आवडतं नाही ते Yogurt सहज खातात. 

योगर्ट आणि दह्यामध्ये काय फरक आहे? (What is the difference between yogurt and curd?)

योगर्ट दुधात बॅक्टेरियाच्या मदतीने यीस्ट तयार केलं जातं. ह्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅक्टेरियाला योगर्ट कल्चर असं म्हटलं जातं. तर दही बनविण्यासाठी दुधात अॅसिडीक सबस्टन्स म्हणजे लिंबाचा रस किंवा व्हिनेगर (Vinegar) टाकलं जातं. घरोघरी दही बनविण्याची सोपी पद्धत म्हणजे दुधाला विरजण लावणे म्हणजे दूध हलकं गरम करायचं आणि त्यात एक चमचा दही मिक्स करायचं. हे मिश्रण  3-4 तासांसाठी ठेवून द्यायचं. त्यानंतर दही तयार होतं. दही हे योगर्टपेक्षा जास्त आंबट असतं. योगर्टमध्ये कमी कॅलरीज असतात. तसंच ज्यांना डेअरी प्रोडक्ट्सपासून एलर्जी असेल त्यांना योगर्ट हा पर्याय चांगला आहे.

योगर्टमध्ये कॅलशियम, रायबोफ्लेलिन व्हिटॅमिन बी2,फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम, आयोडिन, व्हिटॅमिन बी12 आणि प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास योगर्ट सेवन करणे फायद्याचे आहे. पण योगर्ट घरी बनवणे तेवढं सोपे नाहीत. 

A Food Show with Kunal Kapur या शोमध्ये प्रसिद्ध शेफ कुणाल कूपर यांनी योगर्ट आणि दही यांच्या फरक समजून सांगितला आहे.  पाहा ते काय म्हणतात...

 (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)