Lifestyle: स्वयंपाकासाठी वापरला जाणारा मसाला भेसळयुक्त आहे की नाही? कसं ओळखायचं हे जाणून घ्या

Spice Adulteration: हल्ली प्रत्येक गोष्टीत भेसळ (real vs fake spices)  होत असल्यानं एखादा पदार्थ खावा की खाऊ नये? असा भितीदायक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. अन्नधान्य, भाज्या, दूध यांसारख्या जीवनावश्यक बाबींमध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. यामुळे लोकांना खाणं-पिणंच अवघड झाले आहे.  

Updated: Oct 2, 2022, 02:45 PM IST
Lifestyle:  स्वयंपाकासाठी वापरला जाणारा मसाला भेसळयुक्त आहे की नाही? कसं ओळखायचं हे जाणून घ्या    title=

Real vs Adulterated Spices:  सध्या बाजारात भेसळयुक्त मसाल्यांचा खप वाढताना दिसत आहे. हे भेसळयुक्त मसाले आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरतातय. काही वेळा हे भेसळयुक्त पदार्थ जीवघेणेही ठरतात. यामध्ये विटांची पूड, सिमेंट, पपईच्या बिया, चुना अशा अनेक गोष्टी मिसळून पकडले जातात.

असे ओळखा भेसळयुक्त पदार्थ

मसाल्यांमध्ये काळी मिरी, लाल तिखट, हळद आणि जिरे यांची सर्वाधिक भेसळ होते. येथे नमूद केलेल्या पद्धतींद्वारे, तुम्ही त्यांची खरं की बनावट (Adulterated Spices identification) सहज ओळखू शकता.

जिरे कसे ओळखावे

एक चमचा जिरे घेऊन हातामध्ये घेऊन जोरात चोळा. असे केल्याने जिऱ्यातून रंग निघू लागला तर समजा तुम्हाला दिलेले जिरे बनावट आहे.

हळद कशी ओळखायची

खरी आणि नकली हळद ओळखण्यासाठी एका ग्लासमध्ये गरम पाणी घ्या आणि त्यात हळद मिसळा. जर हळद काचेच्या तळाशी बसू लागली तर समजून घ्या की तुम्हाला दिलेली हळद खरी आहे.

काळी मिरी कशी ओळखायची

काळी मिरी ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे एक ग्लास पाणी भरणे आणि नंतर त्यात काळी मिरी घाला. जर काळी मिरी पाण्याच्या तळाशी गेली तर समजा मिरची खरी आहे. नाहीतर तुम्हाला काळी मिरीच्या नावाने पपईच्या बिया दिल्या आहेत. ही पद्धत FSSAI ने सांगितली आहे.

वाचा : T20 World Cup : नेमका हा रेकॉर्ड कोणता आहे? जो वर्ल्डकप जिंकूनही मोडू शकणार नाही, तुम्हाला माहितीय का?

लाल तिखट कसे ओळखावे

लाल तिखट ओळखण्यासाठी एका ग्लासमध्ये पाणी भरून त्यात लाल तिखट टाका.  जर लाल तिखट पाण्यात विरघळली आणि रंग बदलला तर समजून घ्या की तुमची बनावट पकडली गेली आहे.

 

 

 

 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)