मुंबई : रात्रीची झोप सर्वांना प्रिय असते. ती शांत, पुरेशी मिळावी असे प्रत्येकाला वाटते. पण घरात कोणाला घोरण्याची सवय असेल तर? मग मात्र शांत झोप लागणे कठीण होते. अनेकदा या व्यक्तींचा रागही येतो. पण यावर उपाय काय? थकवा, नाक बंद होणे यामुळे घोरण्याची समस्या उद्भवते. याची कारणे काहीही असली तरी या उपयांनी त्यावर मात करता येईल. तर जरुर करुन पहा हे उपाय...
पाठीवर झोपणे चांगले मानले जाते. मात्र खूप कमी लोकांना माहित आहे की, पाठीवर झोपल्याने घोरण्याची शक्यता वाढते. कारण पाठीवर झोपल्याने तुमचा टाळू आणि जीभ गळ्यातील वरच्या भागात येतात. त्यामुळे मोठ्या आवाजात ध्वनी उत्पन्न होतो आणि तोच आवाज घोरण्यात बदलतो. यामुळेच सरळ पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर झोपा. कुशीवर झोपल्याने घोरण्याची शक्यता कमी होते.
घोरणारे अनेक लोक स्थूल असतात. स्थुलतेमुळे गळ्याजवळ खूप अधिक फॅट्स जमा होतात. त्यामुळे गळ्याजवळील पेशी आकूंचन पावतात आणि हेच घोरण्याचे मोठे कारण ठरते. यापासून वाचण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार वजन घ्या.
झोपण्यापूर्वी पुदीन्याच्या तेलाचे काही थेंब पाण्यात घालून गुळण्या करा. त्यामुळे नाकपुड्यातील सुज कमी होवून श्वास घेणे सोपे होते. नाकाजवळ पुदीन्याचे तेल लावल्यानेही फायदा होतो.
ऑलिव्ह ऑईलमुळे श्वास घेताना होणारा त्रास दूर होतो. रात्री झोपण्यापूर्वी मधासोबत ऑलिव्ह ऑईल घेतल्याने फायदा होतो.
उशी घोरण्याचे कारण होऊ शकते. नियमित उशीचे कव्हर न बदलल्यास त्यामुळे घोरण्याला उत्तेजना मिळते. अनेकदा डोक्यातील कोंडा, केस उशीवर पडतात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसंच यामुळे एलर्जी होऊ शकते. श्वास घेण्याची क्षमतेला नुकसान पोहचते. त्यामुळे उशीचे कव्हर नियमित बदला आणि स्वच्छ कव्हरचा वापर करा.