'या' लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नये केळी; जाणून घ्या योग्य वेळ आणि पद्धत

बरेच लोकांना सकाळी रिकाम्या पोटी फळं खायला आवडतात. शिवाय भूक लागली की भूक भागवाण्यासाठी स्वस्त आणि सहज मिळणार फळ म्हणजे केळ. पण तुम्हाला माहितीय का सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास फायदाऐवजी नुकसान होतं.   

नेहा चौधरी | Updated: Dec 8, 2024, 06:43 PM IST
'या' लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नये केळी; जाणून घ्या योग्य वेळ आणि पद्धत  title=

केळ हे असं फळ आहे, जे प्रत्येक ऋतूमध्ये सहज उपलब्ध असतं. शिवाय सगळ्यात स्वस्त आणि उर्जेने समृद्ध असलेले हे फळ भूक कमी करण्यास आणि वजन वाढविण्यात खूप जास्त फायदेशीर मानलं जातं. हे खाल्ल्याने पोट सहज भरते आणि शरीराला त्वरित ऊर्जा मिळतं हे आपल्याला माहितीये. बरेच लोकांना सकाळी रिकाम्या पोटी फळं खायची सवय असते. त्यातील एक फळ आहे केळ. पण तुम्हाला माहितीये रिकाम्या पोटी दुधासोबत केळी खाणे आपल्या शरीराला मोठं नुकसान होतं, असं तज्ज्ञ सांगतात. कोणत्या लोकांसाठी हे रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास नुकसान होतं पाहूयात. (These people should not eat bananas in the morning on an empty stomach Know the right time and method)

सकाळी रिकाम्या पोटी केळी कोणी खाऊ नये?

केळी हे फायदेशीर असले तरी काहींना सकाळी रिकाम्या पोटी यांचं सेवन केल्यास अनेक समस्या निर्माण होतात. या लोकांना गॅस आणि ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे रिकाम्यापोटी नाश्त्यात केळी खाण्यासोबत काहीतरी सोबत खावं. कारण केळ्यामध्ये अनेक कार्बोहायड्रेट्स आढळतात, ज्यामुळे पचनामध्ये समस्या निर्माण होतात. कधीकधी रिकाम्या पोटी याचं सेवन केल्याने पोट खराब होणे, उलट्या होणे किंवा इतर समस्या तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे केळी नेहमी इतर पदार्थांसोबत खावी. फक्त केळी खाणे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरु शकतं. 

रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने वजन वाढतं

सकाळी रिकाम्या पोटी केळीचे सेवन केल्यास वजन वाढण्यास मदत होते. केळीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज खूप जास्त असतात. जर तुम्ही मध्यम आकाराचे केळ खाल्ल्यास तर तुम्हाला सुमारे 25-30 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि 90-105 कॅलरीज मिळतात. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर केळी खाणे टाळा. 

केळी खाण्याची योग्य वेळ कोणती?

खरंत तज्ज्ञ सांगतात केळी खाण्यासाठी दिवसातून सेवन करणे चांगलं आहे. दिवसा केळी खाल्ल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. पोटही बराच काळ भरलेले राहते. याशिवाय दुपारी किंवा संध्याकाळी केळी तुम्ही खाऊ शकता.  

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)