Kids Health : पालक होणं सोप नाही. मुलांना चांगला माणूस घडविण्यापासून त्याला आयुष्यातील संकटासोबत लढण्यासाठी तयार करणं, ही काही छोटी गोष्ट नाही. आजकाल सोशल मीडियामुळे मुलांना अनेक गोष्टी सहज दिसतात आणि कळतात आहे. चित्रपट असो किंवा सोशल मीडियावरील काही व्हिडीओमुळे मुलांना अनेक गोष्टी आज सहज कळत आहेत. (Sexual Wellness)
पण मुलांना त्यांच्या शारीरिक बदल आणि मुलींना मासिक पाळीबद्दल योग्य माहिती असणं गरेजच आहे. पण एक पालक म्हणून तुम्हाला कळतं नाही मुलांशी कुठल्या वयात आणि कसं बोलावं ते? तर आज आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत.
तुमच्या मुलीसाठी पहिली मासिक पाळी (periods) येणे हा तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. त्याबद्दल तिला योग्य माहिती असणे फार महत्त्वाचे असते. अन्यथा तिला त्याबद्दल चुकीचा समज आणि भीती वाटू शकते. या गोष्टींचा परिणाम मग मुलीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर पडू शकतो.
तज्ज्ञांनुसार मुलांशी याबद्दल बोलण्यासाठी वयाची मर्यादा नाही. पण वयात येण्यापूर्वी बोलणं कधीही चांगलं. या विषयावर बोलताना तुम्ही कुठलाही संकोच बाळगू नका. या विषयावर मुलांशी मोकळेपणाने बोला. खरं तर 6 किंवा 7 वर्षांची मुलं ही मासिक पाळीविषयी मूलभूत गोष्टी समजू शकतात. (sexual wellness tips for talking with kids about periods puberty How to talk to in marathi)
त्यांना यौवनाबद्दल समजून सांगा. त्यांचा शारीरिक बदलाला बदल बोला. मुलगा असो वा मुलगी वाढत्या वयासोबत दोघांच्या शरीरात बदल घडून येतात. त्याबद्दल पालकांनी त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. पुस्तकी ज्ञान हे ठिक आहे. पण त्यांचा मनातील प्रश्नांना तुम्हीच योग्य उत्तर देऊ शकता, हे लक्षात ठेवा. आतापासून या गोष्टी का असं म्हणून बोलणं टाळू नका. त्यांना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्या.
कारण घरात मोठी बहीण किंवा महिला जेव्हा पॅड विकत घेते त्यांचा मनात प्रश्न पडतात. या प्रश्नांची तेव्हाच त्यांना उत्तरं द्या. त्यांना काय आणि कितपत सांगायचं हे तुमच्या मुलाच्या वयानुसार आणि त्याचा विकासाच्या पातळीवर अवलंबून आहे. मुलांना विचारा की त्यांनी यौवनाबद्दल काय ऐकलं आहे. ती त्याबद्दल काय विचार करते ते आधी त्यांना विचारा. मग त्यात काय चुकीचं आणि काय बरोबर ते सांगा.
मुलांना तुमचे अनुभव सांगा. पुस्तक आणि वेबसाइटवरील व्हिडीओच्या माध्यमातून त्यांना हे सगळं समजून सांगा. मुलींना मासिक पाळी दरम्यान काय होतं, ते किती काळ राहते, त्याची लक्षणं, पीएमएसची संकेत, पॅड आणि टॅम्पन्स यांची निवड कशी करायची याशिवाय यादिवसांमध्ये शरीराची स्वच्छा किती गरजेची आहे समजून सांगा. वजाइनल डिस्चार्ज येणे सुद्धा मासिक पाळीचाच संकेत हे मुलीला सांगून ठेवा. या दिवसात होणाऱ्या वेदनेबद्दलही तिला सांगा. त्याशिवाय या काळात चिडचिड, भूक लागणे म्हणजेच एकंदरीत त्यांचा मानसिक आरोग्यावरही यादिवसात कसा परिणाम होतो ते सांगितलं पाहिजे.
जर तुमची मुलगी 15 वर्षांची असेल आणि तिला अद्याप पहिली मासिक पाळी आली नसेल. याशिवाय तीन वर्षांपासून तिच्या स्तनांचा विकास सुरु झाला असेल आणि तरीही मासिक पाळी आली नसेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मुलांनी जेवढं मासिक पाळीबद्दल माहिती असायला हवं तसंच मुलांनाही त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. ही एक नैसर्गिक गोष्ट आहे यात पुरुष आणि स्त्री असा भेद करणे योग्य नाही. जसं मुली वयात येतात त्यांचा शरीरात बदल होतात तसंच मुलं वयात येतात त्यांचाही शरीरात बदल दिसून येतात. सामान्यपणे मुले 12 ते 14 वर्षांची झाल्यानंतर मुलांच्या (Puberty) शरीरात बदल दिसून येतात.
1) खासगी जागेत केस उगवू लागतात.
2) अंडकोशांची(Testicles)वाढ होण्यास सुरुवात होते.
3) अंडाशयाची( Scrotum) पिशवी प्रसरण पावून मोठी होते.
4) लिंगाची(Penis) लांबी वाढून अंडाशयाचा आकार मोठा होणे.
5) चेहऱ्यावर पुरळ (Acne) येणं.
6) चेहऱ्यावरील केस म्हणजेच दाढी-मिशी येणं.
7) रात्री कामुक स्वप्न पडणे किंवा झोपेत शीघ्र पतन (Early fall) होणं.
याकाळात शरीरातील या बदलामुळे काही मुलं चिडचिड करतात, (anger issues) भीती(anxiety)आणि डिप्रेशन(Depression) यांसारखे विविध लक्षणं दिसून येतात. या दिवसांमध्ये मुलांना तुमच्या मानसिक आधाराची सर्वाधिक गरज असते. रात्री कामुक स्वप्न पडणे किंवा झोपेत शीघ्र पतन यामुळे मुलं घाबरलेलं असतं. आपल्यासोबत काही तरी चुकीचं होतंय, आपण आजारी आहोत किंवा आपण कुठली तरी चूक करतोय अशा भावना त्यांच्यामध्ये निर्माण होतात. त्यामुळे या काळात त्यांचा संवाद साधणे गरजेचं आहे. जे करुन ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्यांची चुकीची समजूत त्यांचा मनात तयार होऊ नये याची काळजी पालकांनीच घेणं गरजेचं आहे.
लक्षात ठेवा, प्रत्येक मूल अद्वितीय आहे. तुम्ही त्यांची परिपक्वता पातळी आणि विशिष्ट गरजांनुसार त्याच्याशी कसं बोलायचं हे तुम्हालाच ठरवावं लागणार आहे.