Weight Loss करण्यासाठी आता घाम गाळायची गरज नाही, कसं ते जाणून घेण्यासाठी वाचा...

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी अनेकजण जीमला जातात, आहारात बदल करतात, जेवण कमी करतात तरी देखील वजन कमी होत नाही. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही, तुमच्य आहारात फक्त या 4 पद्धतीच्या चपातीचा समावेश करा...

श्वेता चव्हाण | Updated: May 28, 2023, 10:26 AM IST
Weight Loss करण्यासाठी आता घाम गाळायची गरज नाही, कसं ते जाणून घेण्यासाठी वाचा...  title=
weight loss roti

Weight Loss Tips In Marathi : वजन कमी करणे हा निरोगी जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. परंतु आजच्या जगात बहुतेक लोकांना त्यांचे वजन नियंत्रित करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जसे की, आहार आणि व्यायाम हा प्लॅन फॉलो करावा लागतो. साध्या जीवनशैलीच्या सवयींमुळे तुमचे वजन कमी होऊ शकते. पारंपारिक आहार किंवा व्यायाम योजनांशी त्याचा काहीही संबंध नाही. आरोग्य तज्ञांनी अनेक पद्धती शोधून काढल्या आहेत ज्याद्वारे तुम्ही घाम न गळता किंवा उपवास न करता आपोआप वजन कमी करू शकता. यासाठी केवळ तुम्हाला खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल करायचा आहे. 

चोकर चपाती

चपातीपासून अधिक पोषण मिळवायचे असेल तर पिठामधील कोंडा वेगळा करु नका. याचे कारण म्हणजे पिठाच्या कोंड्यात अधिक पौष्टिक घटक असतात. गव्हाच्या चपातीमध्ये कार्ब्स, आयर्न, नियासिन, व्हिटॅमिन बी6, थायामिन आणि कॅल्शियम असते आणि कोंडियामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते.

वाचा: तुम्हालाही 'या' वाईट सवयी असतील, तर शुगर वाढलीच समजा!

मल्टीग्रेन चपाती

जर तुम्हाला रोटी अधिक चवदार बनवायची असेल तर त्यात एक चमचा बेसन घाला. बेसनमध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचा पुरावा नसतो. यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होण्याची प्रक्रिया चांगली होते. अशा प्रकारे गव्हाच्या पिठात बेसन घालून मल्टीग्रेन पिठ तयार केले जाऊ शकते. 

सत्तुची चपाती

सत्तुचे पीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही सत्तूच्या पिठापासून चपात्या बनवू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांत सत्तूचे पीठ दूधात टाकून खातो. या रोटीचे नियमित सेवन केल्याने तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास आणि शरीर सक्रिय ठेवण्यास मदत करते. तसेच वजन कमी करण्यास मदत होते.

सोया चपाती

सोयाबीन हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या चपातीमध्ये ओमेगा-3 अॅसिड मुबलक प्रमाणात असते. तसेच चपातीत भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. सोया चपाती वृद्धापकाळासाठी फायदेशीर मानली जाते.

शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते

जास्त पाणी प्यायल्याने भूक कमी लागते. त्यामुळे वजन कमी होण्यास होते. सकाळी उठल्यावर लगेच पाणी प्यायल्याने शरीरातील अॅसिडिटी कमी होते. तसेच सकाळी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. जर तुम्ही डायटिंग करत असाल तर सकाळी पाणी प्यावे. त्यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिक रेट वाढतो.

जंक फूड आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा

वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा. तेलकट पदार्थ आणि जंक फूडमुळे वजन वाढते. आहारात विविध फळांचा समावेश करा. तसेच पॅकेज केलेले अन्न खा. 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)