Sanitary Napkins : तुम्हीही तपासणी न करता सॅनिटरी पॅड्स (Sanitary Pads) खरेदी करता का? जर तुम्हाला अशी सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण नवीन केलेल्या एका संशोधनानुसार, भारतात तयार होणारे सॅनिटरी नॅपकिन्स (Sanitary Napkins) कॅन्सरसारख्या (Cancer) जीवघेण्या आजाराचं कारण बनू शकतात. हे सॅनिटरी नॅपकिन्स तयार करण्यासाठी धोकादायक केमिकल (Chemicals) वापरले जात असल्याचं या संधोधनातून समोर आलंय. इतकंच नाही तर या केमिकल्समुळे मधुमेह आणि हृदयाचे आजारही होण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील टॉक्सिक्स लिंक या एनजीओमार्फत हा अभ्यास आंतरराष्ट्रीय प्रदूषण निर्मूलन नेटवर्कच्या चाचणीचा एक भाग आहे. या स्टडीमध्ये भारतात विकल्या जाणार्या 10 ब्रँडच्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या प्रोडक्ट्सचा समावेश करण्यात आला होता.
या अभ्यासावेळी संशोधकांनी सर्व नमुन्यांमध्ये थॅलेट (phthalates) आणि वोलेटाइल ऑर्गेनिक कंपाउंडचे (VOCs) काही घटक मिळाले. हे दोन्ही दूषित पदार्थ कॅन्सर सेल्स तयार करण्यासाठी सक्षम असतात. हा रिसर्च 'मेंन्स्ट्रुअल वेस्ट 2022' मध्ये प्रकाशिक करण्यात आला आहे.
थॅलेट्स केमिकलचा त्वेचशी संपर्क आला कॅन्सर, मधुमेह आणि हृदयाच्या आजारांचं कारण बनू शकतं. यामुळे महिलेच्या प्रजनन क्षमतेवरही वाईट परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे VOCs च्या संपर्कात आल्याने मानसिक क्षमतेवर परिणाम होतो. हे अस्थमा आणि काही प्रकारचे कॅन्सरचंही कारण बनू शकतो.
हा अभ्यास केलेल्या तज्ज्ञांच्या टीमने सांगितं की, महिलांच्या शरीरावरील इतर त्वचेपेक्षा योनीमार्गाच्या त्वचेवर गंभीर केमिकल्सचा अधिक परिणाम होता. यामुळे गंभीर आजार जसं की, कॅन्सर होण्याचा धोकाही वाढतो.
एका रिपोर्टनुसार, भारतात 15 ते 24 वर्षांच्या 64.4 टक्के महिला सॅनिटरी पॅड्सचा वापर करतात. गेल्या काही वर्षांमध्ये सॅनिटरी पॅड्सच्या वापराबाबत जागरूकता वाढल्याचं दिसून आलंय. गंभीर आजारापासून वाचण्यासाठी मासिकपाळीत सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर केला जातो. मात्र रिसर्चच्या माध्यमातून नॅपकिन्समध्ये जे केमिकल्स आढळले आहेत, ते आरोग्यासाठी धातक असल्याचं दिसून आलंय.