Drinking Water : पाणी पिणं (Drink Water) आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपण दररोज पुरेसं पाणी प्यावं जेणेकरुन आपली त्वचा (Skin) आणि अंतर्गत अवयव निरोगी राहतील. मात्र आपल्याला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की, जास्त प्रमाणात आणि चुकीच्या वेळी काहीही खाणं किंवा पिणं हानिकारक ठरू शकतं. अनेकदा अशी स्थितीही उद्धवते ज्यावेळी आपण एकदम पाणी पिणं टाळलं पाहिजे. अन्यथा आपल्याला धोकादायक आजारांचा सामना करावा लागू शकतो. चला, या परिस्थितींविषयी जाणून घेऊया.
आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या सांगण्यानुसार, काही परिस्थितीत अचानक किंवा जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास तुम्हाला आरोग्यासंबंधी काही तक्रारी उद्भवू शकतात. म्हणून, खाली दिलेल्या परिस्थितीत जास्त प्रमाणात पाणी पिणं टाळावं.
डॉ. रंजना यांच्या म्हणण्याप्रमाणे काही लोकं झोपण्यापूर्वी खूप पाणी पितात. मात्र हे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. झोपल्यापूर्वी अधिक पाणी प्यायल्याने दोन तक्रारींना सामोरं जावं लागतं. यामध्ये सतत लघवीला येत असल्याने झोपमोड होते आणि पुन्हा झोप येण्यास उशीर होतो.
तर दुसरा त्रास म्हणजे झोपेत असताना आपली किडनी हळू काम करते. यामुळे दुसर्या दिवशी सकाळी शरीरात द्रवपदार्थ टिकून राहू शकतो आणि चेहरा आणि सांध्याभोवती सूज येऊ शकते.
इंटेस वर्कआउट दरम्यान घाम आल्याने तुम्हाला खूप तहान लागेल. परंतु जर तुम्ही इंटेस व्यायामादरम्यान भरपूर पाणी प्याल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कारण, हे केल्याने, वर्कआउट्समुळे शरीराचे वाढतं तापमान अचानक कमी होईल आणि शरीरात उपस्थित सोडियम आणि पोटॅशियम सारख्या इलेक्ट्रोलाइट्सची पातळी कमी होण्याची शक्यता असते. ज्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणं ही समस्या असू शकते.
जर आपण कृत्रिम स्वीटनर्ससह पाणी पित असाल तर सावधगिरी बाळगा. कृत्रिम साखर कमी-कॅलरीयुक्त पदार्थ आहेत. परंतु एनसीबीआयने जून 2010 मध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, ते आपली भूक वाढवू शकतात आणि वजन वाढवू शकतात.