Heart Attack Medicines : कोरोना महामारीनंतर हृदय विकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अभिनेत्यांचे कमी वयात हृदय विकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वृद्ध व्यक्तींना नाही तर तरुणांनाही गाठलंय. हिवाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनलते. बहुतांश घटनांमध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू होतो, यावरून हृदयविकाराचा झटका आल्यास तत्काळ आणि प्रथमोपचाराची माहिती नसणे हे लोकांचे प्राण वाचवण्यात अडथळा ठरत असल्याचे दिसून येते. (Rs 7 ram kit will be a lifesaver on Heart Attack how to take the medicine)
कानपूरच्या LPS कार्डिओलॉजी हॉस्पिटलचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नीरज कुमार यांनी स्वस्त आणि सोपे 'राम किट' विकसित केलंय. हे किट अवघ्या 7 रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि त्यात हृदयविकाराचा झटका आल्यास तीन आवश्यक औषधांचा समावेश करण्यात आलाय. यात इकोस्प्रिन, सॉर्बिट्रेट आणि रोसुवास 20 ही औषधं या कीटमध्ये आहे.
डॉक्टर नीरज कुमार म्हणतात की हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाने ही तीन औषधं घेतल्यास त्याचा जीव वाचण्याची शक्यता लक्षणीय वाढते. लोकांना औषधांचं नाव सहज लक्षात राहावे आणि संकटाच्या वेळी त्याचा त्वरित वापर करता यावा यासाठी या किटला 'राम किट' असं नाव देण्यात आलंय. 'राम किट' नाव देण्यामागचा उद्देश लोकांमध्ये भावनिक संबंध निर्माण करणे हा आहे, जेणेकरून ते या किटबद्दल अधिक जागरूक आणि आत्मविश्वासाने बनतील.
हृदयविकाराचा झटका आल्यास हे किट वापरणे खूप सोपे आहे. इकोस्प्रिन रक्त पातळ करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा सुधारतो. Sorbitrate टॅब्लेट हृदयाला त्वरित आराम देते आणि Rosuvas 20 कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. योग्य वेळी वापरल्यास या औषधांचे मिश्रण जीवरक्षक ठरू शकते.
डॉक्टर नीरज कुमार सांगतात की, या किटचा वापर नियमितपणे करू नये, फक्त हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीतच केला पाहिजे. यासोबतच त्यांनी रुग्णालयात दाखल केलेल्या रूग्णांना मानसिक शांती देण्यासाठी धार्मिक पुस्तकंही दिली आहेत, जेणेकरून त्यांना शांतता आणि सकारात्मकता अनुभवता येईल.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)