Health Tips: रिकाम्या पोटी ज्यूस पिऊन दिवसाची सुरुवात करावी का? जाणून घ्या

बऱ्याचदा तुम्ही लोकांकडून असे ऐकले असेल की, ते स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी सकाळी लवकर रिकाम्या पोटी ज्यूस पितात.

Updated: Feb 18, 2022, 04:08 PM IST
Health Tips: रिकाम्या पोटी ज्यूस पिऊन दिवसाची सुरुवात करावी का? जाणून घ्या title=

मुंबई : सध्याच्या बिझी लाईफ शेड्युलमध्ये लोकांना आपल्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणून मग अनेक लोक आपल्या आहाराची आणि त्याच्या वेळेची काळजी घेतात. जेणेकरुन त्यामार्गाने तरी त्यांना शरीराची काळजी घेता येईल. काहीजण आपल्या आहारात हेल्दी फुड खायला सुरुवात करतात.

बऱ्याचदा तुम्ही लोकांकडून असे ऐकले असेल की, ते स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी सकाळी लवकर रिकाम्या पोटी ज्यूस पितात. परंतु तुम्हाला काय वाटतं, ही पद्धत योग्य आहे का? खरंच रिकाम्या पोटी ज्युस प्यायलाने आपल्या शरीराला फायदा होतो का?

तसे पाहाता शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ताज्या फळांचा रस पिणे फायदेशीर मानले जाते. कारण शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे फळांमध्ये आढळतात. म्हणूनच लोक सकाळी ज्यूस पिऊन दिवसाची सुरुवात करतात.

परंतु रिकाम्या पोटी ज्यूस पिणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. रिकाम्या पोटी कोणते फळांचे ज्यूस पिऊ नये.

लिंबूवर्गीय फळांचा रस

रिपोर्ट्सनुसार, लिंबूवर्गीय फळांचा रस प्यायल्याने तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकते. उदाहरणार्थ, रिकाम्या पोटी संत्र, मोसमी, द्राक्ष किंवा लिंबाचा रस पिल्याने समस्या उद्भवू शकतात, कारण ही फळं लिंबूवर्गीय असल्यामुळे तुम्हाला अॅसिडिटीची तक्रार होऊ शकते. परंतु हे प्रत्येकासाठी हानिकारक नाही.

थंडगार रस

याशिवाय सकाळी रिकाम्या पोटी थंड रस पिऊ नका, कारण सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीराला फायदा होतो. सकाळी थंड रस प्यायल्याने तुमच्या त्वचेला नुकसान होऊ शकते. त्यामुळे पचनसंस्थेत समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.

त्यामुळे सकाळी ज्यूस पिण्याची सवय बदला. अन्न खाल्ल्यानंतर ज्यूसचा आहारात समावेश करा.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमान करत नाही.)