फिट राहण्याच्या नादात आणखी आजारी पडताय? निरीक्षणातून हादरवणारा पुरावा

हल्ली अनेकांचा फिट राहण्याकडे कल असतो. पण यासाठी योग्य मार्गदर्शन न घेता सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून वर्क आऊट केलं जातं. पण यामुळे आजारी पडण्याच प्रमाण वाढलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 27, 2024, 08:14 AM IST
फिट राहण्याच्या नादात आणखी आजारी पडताय? निरीक्षणातून हादरवणारा पुरावा  title=

गेल्या काही वर्षांपासून भारतासह अनेक देशांत हेल्थ आणि फिटनेसबाबत खूप जागरुक झाले आहेत. हल्ली प्रत्येकालाच फिट राहायचं आणि फिट दिसायचंय. पण एकमेकांना बघून किंवा फॉलो करुन फिट राहण्याचा दबाव निर्माण होणे ही चुकीची गोष्ट आहे. एका रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा आहे  ज्यामध्ये फिट राहण्याचा दबाव निर्माण झाल्यामुळे लोक आजारी पडत आहेत. 

रिपोर्टच्या निरीक्षणात काय?

Lululemon ने आपला चौथा वार्षिक ग्लोबल वेलबींग 2024 अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की तंदुरुस्त राहण्याचा दबाव लोकांना आजारी बनवत आहे. तंदुरुस्त राहण्याचा दबाव लोकांमध्ये तणाव निर्माण करत आहे. या मुद्द्यावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 89 टक्के लोकांनी तंदुरुस्त राहण्याच्या दबावामुळे व्यायाम केल्याचे सांगितले. त्याच वेळी, जवळजवळ दोन तृतीयांश लोकांचा असा विश्वास होता की समाजाकडून स्वतःला चांगले दाखवण्यासाठी त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. या दबावामुळे, जवळजवळ निम्मे लोक तंदुरुस्त राहण्याच्या या प्रवासातच आजारी पडत आहेत. 

काय आहे वेलबीइंग बर्नआऊट 

वेलबीइंग बर्नआऊट ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये लोक बराच काळ तणाव आणि टेन्शनमध्ये असतात. याचा परिणाम त्या व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. बर्नआऊट पीडित व्यक्तीला वेगवेगळ्या गोष्टी जाणवत असतात. या व्यक्तीची काम करण्याची पद्धत अतिशय वेगळी असते. 

रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा 

लुलेलेमने सीईओ कॅल्विन मॅकॉनल्डने सांगितलं की, आम्हाला जगभरात लोकं आरोग्याबाबत जागरुक झाल्याचे दिसतात. या माहितीद्वारे आम्ही लोकांना प्रोत्साहन आणि मदत करण्याची आशा करतो. हा डेटा आम्हाला सांगतो की, इतरांसोबत हँग आउट करणे आणि सामाजिक असणे. 

जागरुकता वाढत आहे 

जगभरात आरोग्याबद्दल वाढती जागरुकता असली तरीही शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बाबतीत वेलबीईंग इंडेक्स स्कोर गेल्या चार वर्षांपासून वैश्विक स्तरावर स्थिर आहे. हा धक्कादायक आकडा आरोग्याच्या बाबतीत सतर्क होण्याचे संकेत देतात. 

निरीक्षणात धक्कादायक खुलास 

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 61% लोकांचं म्हणणं आहे की, त्यांच्यावर चांगल दिसणं आणि फिट राहण्याच एक प्रेशर आहे. हे प्रेशर समाजाकडून निर्माण झाले आहे. 53% लोकांचं म्हणणं आहे की, आरोग्य अधिक चांगल बनवण्याच्या नादात ते अनेक चुका करत आहे. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)