या ४ राशीच्या मुली असतात प्रामाणिक जोडीदार!

आयुष्यभर आपल्या पार्टनरचे प्रेम मिळावे, असे प्रत्येक मुलाला वाटते.

Updated: May 15, 2018, 01:03 PM IST
या ४ राशीच्या मुली असतात प्रामाणिक जोडीदार! title=

मुंबई : आयुष्यभर आपल्या पार्टनरचे प्रेम मिळावे, असे प्रत्येक मुलाला वाटते. पण प्रत्येक मुलगी प्रामाणिक असेल असे नाही. धोका देणाऱ्या मुलींची काही कमतरता नाही. पण या ४ राशींच्या मुली अत्यंत प्रामाणिक असतात. पहा तुमची रास तर नाही ना यात...?

मेष (२१ मार्च-१९ एप्रिल)

या राशीच्या मुली अत्यंत सुंदर असतात आणि खुलेपणाने आयुष्य जगतात. या मुलींकडे लोक पटकन आकर्षित होतात. या मुली अत्यंत आत्मविश्वासी असतात. प्रत्येक नाते या मुली अत्यंत व्यवस्थित निभावतात. ज्या व्यक्तीसोबत लग्न करतील त्याच्याशी आयुष्यभर प्रामाणिक राहतील. प्रामाणिक असण्याबरोबर त्या पार्टनरकडून बदलाची अपेक्षा करतात. जर पार्टनर त्यांच्या अपेक्षेस खरा उतरा नाही तर त्याला सोडण्यास त्या जराही मागे पुढे पाहणार नाहीत.

वृश्चिक रास (२३ ऑक्टोबर-२१ नोव्हेंबर)

या राशीच्या मुली खूप समजूतदार असतात. पार्टनरच्या त्रासात त्याला कशी साथ द्यावी, हे त्यांना अत्यंत व्यवस्थित माहित असते. पण त्यांना त्याचे स्वातंत्र्य अत्यंत प्रिय असते. त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू दिल्यास ते आयुष्यात आनंद आणतील पण सारखी दखल दिल्यास आयुष्य बिघडवण्यासही कमी करणार नाहीत. या मुलींना व्यक्तीची पारख उत्तम असते. जर या मुलींनी जीवनसाथी म्हणून कोणाला निवडल्यास त्यांच्यात काही खास गोष्ट नक्कीच असेल.

मकर रास (२२ डिसेंबर-१९ जानेवारी)

मकर राशीच्या मुली अत्यंत प्रामाणिक असतात. घर, ऑफिस, मुले अशी तारेवरची कसरत त्या लिलया निभावतात. या राशीच्या मुलींना अतिशय व्यवस्थित ढंगात काम करणे, पसंत आहे. यात कोणतीही हयगय केलेली त्यांना आवडत नाही. नात्यात पडण्यापूर्वी खूप वेळ घेणाऱ्या मुली नात्यात पडल्यानंतर प्रत्येक प्रसंगात नेहमी साथ देतात.

कन्या (२३ ऑगस्ट-२२ सप्टेंबर)

कन्या राशीच्या मुलींचे मन अगदी निर्मळ असते. या मुली ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात त्याच्या नावे संपूर्ण आयुष्य करतात. या राशीच्या मुलीशी एकदा ताळमेळ बसल्यास तुमचे वैवाहिक आयुष्य अगदी सुरळीत होईल.