'या' उपायांंनी नैसर्गिकरित्या दाट आणि उठावदार होतील भुवया

प्रत्येकीच्या चेहर्‍यानुसार तिच्या आयब्रोचा आकार अवलंबून असतो. 

Updated: May 14, 2018, 11:32 PM IST
'या' उपायांंनी नैसर्गिकरित्या दाट आणि उठावदार होतील भुवया  title=

 मुंबई : प्रत्येकीच्या चेहर्‍यानुसार तिच्या आयब्रोचा आकार अवलंबून असतो. काहीजणी आयब्रो दाट दिसायला हवेत याकरिता पेन्सिलचा वापर करतात. मात्र काही घरगुती उपायांनीदेखील तुम्ही भुवयांजवळील केसांची वाढ दाट करण्यासाठी मदत करू शकतात.

 
 भुवयांची दाट वाढ होण्यासाठी कोणते उपाय कराल? 

 
 दूध -
 
 कापसाच्या बोळ्याने दूध भुवयांवर फिरवा. यामुळे भुवयांवरील केसांना मूळासकट पोषण मिळण्यास मदत होते. परिणामी या ठिकाणी दाट केस वाढायला मदत होते.  
 
 मेथीदाणे - 
 
 रात्रभर मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवा. सकाळी मेथीदाण्याची पेस्ट करा. आंघोळ करण्यापूर्वी मेथीची पेस्ट भुवयांवर लावा. या पेस्टमध्ये बदामाचे तेलही मिसळू शकता. यामुळे त्वचेचे पोषण होते सोबतच भुवयांचे केसही दाट होण्यास मदत होते.  
 
 लिंबाचा रस - 
 
 लिंबाची लहान फोड भुवयांवर फिरवा. एक चतुर्थांश नारळाच्या तेलामध्ये एक सोललेला लिंबू मिसळा. कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण भुवयांवर लावा. त्यानंतर 2 तास उन्हात फिरू नका. 
 
 कांद्याचा रस - 
 
 कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण अधिक असतं. यामुळे भुवयांवरील केसांची वाढ होण्यास मदत होते. कापसाच्या बोळ्याने कांद्याचा रस भुवयांवर लावा . 10-15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. 
 
 नारळाचं दूध - 
 
 नारळाचं दूधही कापसाच्या बोळ्याने भुवयांवर लावल्याने फायदा होतो. रात्रभर नारळाचं दूध लावून झोपा. सकाळी चेहरा सामान्यपणे धुवाव. 
 
 तेलाचा मसाज - 
 
 नारळाचं तेल, एरंडेल तेल, बदामाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑईलाने नियमित मसाज केल्याने  भुवयांवरील केस दाट होण्यास मदत होते.