मुंबई : उन्हाळ्यात लोकं उष्णतेणं त्रस्त आहेत. ज्यामुळे लोकांना कुठेही बाहेर जाण्यासाठी किंवा कोणतंही काम करण्यासाठी कंटाळवाणं वाटतं. परंतु असं असलं तरी उन्हाळ्यात लहान मुलांना शाळेला किंवा कॉलेजला सुट्टी मिळते. ज्यामुळे ते खूपच आनंदी असतात. तसेच हा नकोसा वाटणारा उन्हाळा लोकांना आणखी एका कारणासाठी हवाहवासा वाटतो, तो म्हणजे आंबा. अनेक लोकांना आंबा जीव की प्राण आहे. त्यात क्वचितच अशी लोकं असतील, ज्यांना आंबा आवडत नसावा. आंबा एकतर खाण्यासाठी चवीला असतोच. शिवाय अनेक लोकांना तो त्यांच्या बालपणाच्या आठवणींशी तो जोडतो.
गोड-गोड रसाळ आंबा उन्हाळ्यातील घाम आणि थकवा आपल्याला सगळंच विसरायला भाग पाडतो. त्यात गावी जाऊ आंबे खाण्याची मज्जाच वेगळी आहे.
परंतु आपल्याला सगळ्यात प्रिय असलेल्या या आंब्यापासून शरीराशी संबंधीत काही समस्या उद्भवतात. खरेतर आंबा खाताना आपण बऱ्याचदा अशा काही चुका करतो. ज्यामुळे आपल्या आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते.
त्यामुळे आंबा खाल्यानंतर कोणत्या गोष्टी खावू नये, हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण यांमुळे उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
आंब्यामध्ये खूप गोडवा असतो, त्यामुळे आंबा खाल्यानंतर कोल्ड्रिंक प्यायल्याने शरीरातील साखरेची पातळी अनेक पटींनी वाढू शकते, जे आरोग्यासाठी चांगले नाही.
आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे पोटदुखी होऊ शकते. आंबा खाल्ल्यानंतर किमान अर्ध्या तासाने पाणी प्यावे.
आंबा खाल्ल्यानंतर मिरची किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यास त्वचेला खाज किंवा जळजळ होऊ शकते.
आंबा किंवा कोणत्याही फळासोबत दही खाणं टाळावे. कारण ते फळांसोबत खाल्ल्यास विष, सर्दी आणि ऍलर्जी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
कोल्डड्रिंक्स प्रमाणे गरम पेय देखील आंब्यासोबत पिऊ नये. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)