दररोज या वेळेस खा १ वाटी दही...फायदे वाचून व्हाल हैराण

दह्याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर असते. दह्याला सुपरफूड म्हटले जाते. मात्र याचे सेवन जर तुम्ही लंचमध्ये कराल त्याचा अधिक फायदा होतो. दुधाच्या तुलनेत दही लवकरच पचते. ज्या व्यक्तींचा पोटाचे विकार सतावतात जसे अपचन, बद्धकोष्ठता, गॅससारख्या समस्यांपासून दह्यामुळे सुटका मिळते. यात पाचनशक्ती सुधारणारे चांगले बॅक्टेरिया असतात. तसेच उच्च प्रतीचे प्रोटीनही असते. 

Updated: Apr 4, 2018, 08:45 AM IST
दररोज या वेळेस खा १ वाटी दही...फायदे वाचून व्हाल हैराण title=

मुंबई : दह्याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर असते. दह्याला सुपरफूड म्हटले जाते. मात्र याचे सेवन जर तुम्ही लंचमध्ये कराल त्याचा अधिक फायदा होतो. दुधाच्या तुलनेत दही लवकरच पचते. ज्या व्यक्तींचा पोटाचे विकार सतावतात जसे अपचन, बद्धकोष्ठता, गॅससारख्या समस्यांपासून दह्यामुळे सुटका मिळते. यात पाचनशक्ती सुधारणारे चांगले बॅक्टेरिया असतात. तसेच उच्च प्रतीचे प्रोटीनही असते. 

पचनशक्ती वाढते

दह्याचे नियमित सेवन शरीरासाठी अमृतासमान मानले जाते. पचनासाठी दही अतिशय उपयोगी आहे. पचनक्रिया योग्य नसेल तर तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या जाणवतात. दही रक्ताची कमतरता तसेच थकवा दूर करते. पोटात होणाऱ्या इन्फेक्शनपासून सुटका मिळते. तसेच ज्यांना कमी भूक लागते त्यांच्यासाठीही फायदेशीर ठरते. 

तोंड आल्यास दह्याची मलई त्यावर लावल्याने फायदा होतो. दही आणि मध एकत्र करुन सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यास तोंड बरे होते.

दररोज दही खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तसेच अनेक आजारांपासून बचाव होतो. कोलेस्ट्रॉलचे अधिक प्रमाण रक्तप्रवाहावर परिणाम होतो यामुळे हार्ट अॅटॅक येण्याची भिती अधिक असते. फॅट फ्री दही रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते. तसेच ब्लड प्रेशनची समस्याही दूर होते. 

दह्याचे सेवन दात आणि हांडांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते ज्यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात.

दह्याचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. 

सुंदर केसांसाठी दही अथवा ताकाने केस धुवावेत. आंघोळीआधी दह्याने केसांना चांगले मालिश करा. काही वेळाने केस धुतल्यास कोंडा दूर होतो.