मुंबई : पोषकतत्वांनी भरलेले केळे जितके खाण्यासाठी स्वादिष्ट असते तितकेच आरोग्यासाठी हितकारक असते. यात पोटॅशियम असते जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते. यात नैसर्गिक अँटीअॅसिड असते ज्यामुळे पोटदुखीसारखे आजार बरे होतात. केळं खाल्ल्याने पोटात होणाऱ्या अल्सरचा धोका आणि गॅस होण्याची कारणे दूर होतात.
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्यात केळे फायदेशीर ठरते. तात्काळ उर्जा मिळवण्यासाठी केळे खावे. यातील साखर एनर्जी बूस्टरचे काम करते. केळ्यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. रात्रीच्या वेळेस केळे खाल्ले की सर्दी होते. मात्र यात कितपत तथ्य आहे हे जाणून घ्या.
आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. आशुतोष गौतम यांच्या माहितीनुसार, रात्रीचे केळे खाल्ल्याने कोणताही त्रास होत नाही. मात्र रात्री फार उशिरा केळे खाऊ नये. यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते. केळे पचण्यास जड असते. त्यामुळे रात्रीचे केळे खात असाल तर झोपण्याच्या २ ते ३ तास आधी केळे खावे. रात्रीच्या वेळेस कोणताही आंबट वा थंड पदार्थ खाऊ नयेत. यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते. रात्री इन्फेक्शन होण्याचा धोकाही अधिक असतो.