स्मोक पान खाल्ल्यामुळे 12 वर्षीय मुलीच्या पोटात छिद्र, नायट्रोजन पोटात गेल्यावर काय होतं नुकसान

Smoke Paan Side Effects: बेंगळुरूमध्ये एका लग्नात 12 वर्षांची मुलगी नायट्रोजन पान खाल्ल्याने पोटात छिद्र पडले. द्रव स्वरुपात असलेल्या नायट्रोजनचे दुष्परिणाम समजून घेऊया. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 21, 2024, 01:00 PM IST
स्मोक पान खाल्ल्यामुळे 12 वर्षीय मुलीच्या पोटात छिद्र, नायट्रोजन पोटात गेल्यावर काय होतं नुकसान  title=

Smoke Paan Side Effects: आजकाल लग्नसोहळ्यात किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या समारंभांमध्ये विविध प्रकारचे पदार्थ दिले जातात. ज्याला लोक 'ट्रेंडी फूड्स' म्हणून ओळखतात. लोक लग्नाच्या मेजवानीत असे पदार्थ देण्यास स्टेटस सिम्बॉल मानू लागले आहेत. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमांवर तुम्हाला खाण्यापिण्याचे अनेक विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतील. तुम्हाला हे पदार्थ दिसायला खूप आकर्षक वाटत असतील, पण कधी कधी ते आपला जीवही धोक्यात घालतात. याचे कारण असे की, या पदार्थांना आकर्षक बनवण्यासाठी त्यामध्ये विविध प्रकारच्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. 

बेंगळुरू शहरातील एका 12 वर्षांच्या मुलीची प्रकृती नायट्रोजन पान खाल्ल्यानंतर बिघडली. 12 वर्षाच्या मुलीने नायट्रोजन पान खाल्ल्याने तिच्या पोटात छिद्र पडले. हा त्रास इतका वाढला की, डॉक्टरांना मुलीच्या पोटाचा मोठा भाग कापावा लागला.

द्रव नायट्रोजन खूप हानिकारक 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लिक्विड नायट्रोजन आपल्या शरीरासाठी खूप धोकादायक आहे. द्रव स्वरूपात नायट्रोजन शरीरात प्रवेश केल्याने तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. पण आजच्या फॅशनच्या जमान्यात लोक रोमांचक गोष्टी करण्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत. आज, लिक्विड नायट्रोजनचा वापर लग्नाच्या पार्टीत दिल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जात आहे.

लिक्विड नायट्रोजन खाल्ल्यामुळे होणारे नुकसान 

  • लिक्विड नायट्रोजन खाल्ल्याने चक्कर येऊ शकते.
  • यामुळे मळमळ (उलट्या) होण्याची तक्रार होऊ शकते.
  • यामुळे तीव्र पोटदुखी देखील होऊ शकते.
  • गंभीर परिस्थितीत, यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.
  • अत्यंत कमी तापमानामुळे ते पोटात गेल्यास श्वासोच्छ्वास अचानक बंद होतो.
  • याशिवाय, याचे सेवन केल्याने गुदमरल्यासारखे होऊ शकते.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)