...म्हणून सलमान खानचा यंदाचा वाढदिवस मुंबईतच

भाईचा बर्थ डे यंदा खास 

Updated: Dec 27, 2019, 03:06 PM IST
...म्हणून सलमान खानचा यंदाचा वाढदिवस मुंबईतच  title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे सलमान खानचा आज 54 वा वाढदिवस. सलमान खानच्या वाढदिवसाची तयारी यंदा मुंबईच्या घरी होत आहे. दरवर्षी पनवेलच्या फार्म हाऊसवर बर्थ डे साजरा करणारा सलमान भाई यंदा मुंबईतल्या घरी वाढदिवस साजरा करणार आहे 

सलमान खान बहिण अर्पिताच्या आग्रहामुळे यंदाचा वाढदिवस मुंबईत साजरा करत आहे. प्रोफेशनल आणि पर्सनल काही कमिटमेंट असल्यामुळे सलमान खानने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. 

आणखी एक खास गोष्ट म्हणजे अर्पिता पुन्हा एकदा आई होणारे. सलमानच्या वाढदिवशीच आपल्या बाळाला जन्म मिळावा आणि ही गूड न्यूज सलमानच्या बर्थडेसोबत साजरी करावी अशी अर्पिताची इच्छा आहे. त्यामुळे भाईजानचा यंदाचा बर्थडे त्याच्यासाठी आणि अर्पितासाठी आणखी खास आहे. 

भाऊ सोहेल खानच्या मुंबईतील पाली हिलमधील घरात हा वाढदिवस साजरा होच आहे. सोहेलच्या घरी बर्थ डे बॅश पाहण्यात आला यामध्ये शाहरूख खान, कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, वरूण धवन, सई मांजरेकर, कबीर खान आणि जॅकलीन फर्नांडीससह अनेक कलाकार उपस्थित होते.