बॉलिवूडमध्ये 'ऊ अंतावा' गाण्यासाठी निर्मात्यांची पहिली पसंती कोण? ना करीना, ना कतरिना, तर ही अभिनेत्री आहे निर्मात्यांची पहिली निवड!

'पुष्पा: द राइज' हा 2021 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आणि त्यातील गाणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गेली. विशेषतः 'ऊ अंतावा' हे गाणे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही व्हायरल झाले होते. समंथा रुथ प्रभूचा मोहक डान्स आणि डीएसपीने दिलेले हटके संगीत या गाण्याला आयकॉनिक बनवण्यास कारणीभूत ठरले.    

Intern | Updated: Dec 13, 2024, 06:15 PM IST
बॉलिवूडमध्ये 'ऊ अंतावा' गाण्यासाठी निर्मात्यांची पहिली पसंती कोण? ना करीना, ना कतरिना, तर ही अभिनेत्री आहे निर्मात्यांची पहिली निवड!  title=

पुष्पाच्या यशानंतर निर्मात्यांनी 'पुष्पा 2: द रूल' आला, जो 5 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने सात दिवसांत तब्बल 1000 कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला आणि ब्लॉकबस्टर ठरला. 'पुष्पा 2'मधील 'किसिक' आणि 'पीलिंग्स' यांसारखी गाणीदेखील चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत. मात्र, ‘पुष्पा’च्या पहिल्या भागातील 'ऊ अंतावा' या गाण्याचा क्रेझ आजही कायम आहे.  

नुकत्याच एका 'पुष्पा'चे निर्माते रवी शंकर, नवीन येरनेनी आणि संगीत दिग्दर्शक डीएसपी यांची खास मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान त्यांना विचारण्यात आले की, जर 'ऊ अंतावा' गाणे बॉलिवूडमध्ये पुन्हा तयार करण्यात आले, तर कोणत्या अभिनेत्रीवर ते चित्रित करणार? यावर सुरुवातीला दोघेही संकोचले, मात्र थोड्या गप्पांनंतर त्यांनी त्या अभिनेत्रीचं नाव सांगितलं. ते म्हणाले की, 'ऊ अंतावा'या गाण्यासाठी तृप्ती डिमरी या अभिनेत्रीला घेतलं असतं.

निर्मात्यांच्या मते, 'ऊ अंतावा'साठी तृप्ती डिमरी ही एक योग्य निवड ठरू शकते. तृप्ती डिमरी सध्या तिच्या 'ॲनिमल' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. तिच्या अभिनय कौशल्यामुळे ती निर्मात्यांची पहिली पसंती ठरली आहे. याशिवाय, दीपिका पदुकोणचं नावही त्यांनी नमूद केलं. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की समंथा रुथ प्रभूला या गाण्यापासून बाजूला ठेवणं कठीण आहे. तिच्या मोहक अंदाजामुळेच 'ऊ अंतावा' हे गाणे प्रेक्षकांच्या हृदयाला भिडले आहे.  

हे ही वाचा: https://zeenews.india.com/marathi/entertainment/manoj-bajpayee-hindu-wif...

पुष्पा 2 च्या प्रचंड यशानंतर 'पुष्पा' चित्रपटाचा फॅन बेस अधिकच विस्तारत आहे. अल्लू अर्जुनने या चित्रपटातून साकारलेली 'पुष्पराज' ही व्यक्तिरेखा आता दक्षिण भारतापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती जागतिक स्तरावर पोहोचली आहे. निर्माते रवी शंकर आणि नवीन येरनेनी यांनी मुलाखतीत आणखी काही गुपितं उघड केली आहेत. ते म्हणाले की, पुष्पा मालिकेचा पुढचा भाग देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास तयार आहे.  याचा अर्थ पुष्पा 3 येणार का अशी चर्चा रंगलीय.

तृप्ती डिमरी, दीपिका पादुकोण आणि समंथा यांच्यासारख्या अभिनेत्रींबाबतच्या जाणून घ्यायला चाहते काय उत्सुक असतात. 1000 कोटींच्या कमाईसह 'पुष्पा 2'ने इतिहास रचला आहे, आणि प्रेक्षकांच्या मनातील या चित्रपटाची जागा अजूनही  राज्य करत आहे.