Salman Khan Andaz Apna Apna : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या जोडीनं बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. नसीब आणि सत्ते पे सत्ता सारखे गाजलेले चित्रपट त्यांनी दिले. या जोडीनं मोठ्या पडद्यावर सगळ्यांना वेड लावलं होतं. त्यांच्या चित्रपटात अनेक कलाकारांनी काम केलं. त्यापैकी एक सलमान खान देखील आहे. तुम्हाला आठवतंय का मेहबूब यांनी 'अंदाज अपना अपना' मध्ये सलमान खानला त्या दोघांसोबत काम करण्याचे आश्वासन दिले होते. पण ते स्वप्न कधी पूर्ण झालं माहितीये का?
'अंदाज अपना अपना' या चित्रपटातील तो सीन तुम्हाला आठवतोय का? ज्यात सलमान खान हा वाह वाह स्टुडियोमध्ये फोटोशूट करत असतोस. त्याचवेळी मेहबूब हे सलमान खानच्या लूक्सची स्तुती करताना दिसतात. त्यावेळी सलमान त्यांना विचारतो की मी स्टार होणार ना? लवकरात लवकर वाह वाह प्रोडक्शन सुरु करा असं सांगतो. तर मेहबूब म्हणतात, अरे सुरु झालं आहे अमिताभ यांच्याशी बोलणं झालंय आणि ते तुझ्या वडिलांची भूमिका साकारतील. त्यानंतर अनेक अभिनेत्रींचं नाव घेत मेहबूब हे सलमानला त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार असे सांगतात. सलमानला मेहबूब यांनी दिलेलं हे आश्वासन 'बागबान' या चित्रपटातून पूर्ण झालं.
अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांची जोडी ही 'बागबान' या चित्रपटात होती. हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी अमिताभ यांचं वय हे 61 होतं आणि हेमा मालिनी यांचं वय 55 होतं. यात हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन हे पती पत्नीच्या भूमिकेत दिसले. त्यांची केमिस्ट्री ही सगळ्यांच्या पसंतीत उतरली. मात्र, जर त्यांच्यासोबत आणखी कोणत्या अभिनेत्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले तर तो म्हणजे सलमान खान आहे. या चित्रपटात सलमान खाननं अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मुलगा त्यांनी दत्तक घेतला होता असं दाखवण्यात आलं होतं. त्या दोघांमधील नातं हे सगळ्यांना प्रचंड आवडलं होतं.
हेही वाचा : करीनासमोर 'शाहिद'चा उल्लेख, बेबोची रिअॅक्शन पाहताच उपस्थितांना हसू अनावर
त्याचं कारण म्हणजे सेवानिवृत्त झालेल्या अमिताभ आणि हेमा यांना त्यांची मुलं चांगली वागणूक देत नाहीत. आयुष्यात सगळं काही कमावून देखील त्यांना किंमत दिली जात नाही. वडील एका मुलाकडे जातात तर आई एका मुलाकडे... पण या वयात त्यांच्यात असलेला दुरावा ते दोघं सहन करू शकत नाहीत. यावेळी त्यांना कोण सांभाळतं तर तो आहे त्यांचा दत्तक घेतलेला मुलगा सलमान खान आणि त्याची पत्नी महिमा चौधरी. अशा प्रकारे या चित्रपटातून आई-वडिलांचं त्यांच्या मुलांसोबत असलेलं हे नातं आणि त्यांच्यातील मतभेद किंवा त्यांना देण्यात आलेली वागणूक या सगळ्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहोत. या चित्रपटाचं बजेट हे 10 कोटी होतं तर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल 43.11 कोटींची कमाई केली होती.