करीनासमोर 'शाहिद'चा उल्लेख, बेबोची रिअ‍ॅक्शन पाहताच उपस्थितांना हसू अनावर

Kareena Kapoor : करीना कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 4, 2024, 05:01 PM IST
करीनासमोर 'शाहिद'चा उल्लेख, बेबोची रिअ‍ॅक्शन पाहताच उपस्थितांना हसू अनावर title=
(Photo Credit : Social Media)

Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही सध्या ‘द बकिंघम मर्डर्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या या चित्रपटाला घेऊन सगळ्यांना खूप जास्त उत्सुकता लागली आहे. काल 3 सप्टेंबर मंगळवारी या चित्ररपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरवर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये असलेल्या करीना कपूरसमोर जेव्हा दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या शाहिद या चित्रपटाचा उल्लेख करण्यात आला तेव्हा तिनं दिलेल्या रिअॅक्शननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. इतकंच नाही तर ते पाहून तिथे उपस्थित असलेले सगळे लोक हे टाळ्या वाजवू लागले. 

हंसला मेहका यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘शाहिद’ या चित्रपटाचा यावेळी उल्लेख करण्यात आले. हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं ह्यूमन राइट क्टिविस्ट आणि वकील शाहिद आजमी यांच्यावर आधारीत आहे. चित्रपटात राजकुमार रावनं मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचा उल्लेख करत पत्रकारानं हंसल मेहता यांना प्रश्न विचारला की 'आम्ही तुमचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला आहे, तुम्ही ‘शाहिद’ सारखे चित्रपट बनवले, ज्यांना नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला आहे. आता ही जी मर्डर मिस्ट्री आहे (बकिंघम मर्डर्स), त्यातत देखील संवेदनशील मुद्दा जोडण्यात आला आहे. त्यामुळए मी शाहिदचा उल्लेख केला. तर या दोन्ही चित्रपटांना दिग्दर्शित करणं किती कठीण होतं?' हे ऐकताच करीना कपूरनं डोळे मोठे करत थोडी विचित्र रिअॅक्शन दिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : Hema Committee Report : रजनीकांतच्या समर्थनात उतरली प्रसिद्धी मल्ल्याळी अभिनेत्री, म्हणाली- 'त्याला...'

करीनाची रिअॅक्शन पाहताच आणि पत्रकाराचा प्रश्न ऐकून त्या ऑडिटोरियममध्ये उपस्थित असलेले सगळे लोक टाळ्या वाजवू लागतात. आता करीना कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तर तिनं दिलेल्या या मजेशीर रिअॅक्शननं तिथे उपस्थित असलेल्यांना हसू अनावर झाले. तर व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'आपल्याला असलेलं दु:ख लपवण्यासाठी अशी फेक स्माईल देण्यात येते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'शाहिदचं नावं ऐकून चेहऱ्यावरचे हावभाव लगेच बदलले.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'त्याचा उल्लेख होताच ती अनकम्फर्टेबल झाल्याचे पाहायला मिळाले.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'त्यानं शाहिदचा उल्लेख केल्यानंतर तिच्या स्माईलनं सगळ्यांना उत्तर दिलं.'