'RRR'ने अमेरिकेलाही लावलं वेड, सिनेमागृहातच 'नाचो नाचो' गाण्यावर थिरकले

craze for RRR Movie at the USA : प्रेक्षक सिनेमाच्या पडद्यासमोर जोरदार नाचताना दिसत असल्याचे व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे.

Updated: Oct 10, 2022, 05:49 PM IST
'RRR'ने अमेरिकेलाही लावलं वेड, सिनेमागृहातच 'नाचो नाचो' गाण्यावर थिरकले title=
Unbelievable craze for RRR Movie at the USA NMP

RRR Movie: एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या 'आरआरआर' (RRR Movie) चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने केवळ भारतातच (India) नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे आणि तो ब्लॉकबस्टर (Blockbuster) ठरला आहे. त्याचबरोबर साऊथ सुपरस्टार (South Superstar) राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (Junior NTR) यांची भूमिका असलेला हा चित्रपटही ऑस्करच्या (Oscar nomination) शर्यतीत सामील झाला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'फॉर युवर कन्सिडरेशन' मोहिमेअंतर्गत 14 श्रेणींमध्ये ऑस्करसाठी दावा केला आहे. या चित्रपटाने जगभरातील लोकांना कसे वेड लावले आहे, याची झलक ट्विटरवर (Twitter) शेअर केलेल्या क्लिपमध्ये पाहायला मिळते.

ट्विटरवर शेअर केलेली ही क्लिप अमेरिकेतील (American) एका सिनेमागृहात शूट करण्यात आली आहे. चित्रपटगृहात चित्रपटाचे नाचो-नाचो (Nacho-nacho) गाणे सुरू आहे, त्यादरम्यान प्रेक्षक सिनेमाच्या पडद्यासमोर जोरदार नाचताना दिसत असल्याचे व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे. प्रेक्षक जबरदस्त नाचताना दिसतात. काही लोक स्क्रीनजवळ जाऊन राम चरण आणि एनटीआरच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसतात. ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करताना, 'यूएसएमध्ये आरआरआरची अविश्वसनीय क्रेझ' असे कॅप्शन लिहिले आहे. (Unbelievable craze for RRR Movie at the USA NMP)

एसएस राजामौली दिग्दर्शित 'RRR' हा चित्रपट 2022 मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घातला. हा चित्रपट हिंदीसह अनेक दक्षिण भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला. केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरही या चित्रपटाने भरपूर कमाई केली आणि अनेक विक्रम मोडले.