अमिताभ यांच्याबाबत रेखा यांनी दिले होते हे स्पष्ट उत्तर, ऐकूण सर्वांनाच बसला होता धक्का

Happy Birthday Rekha : रेखा यांचा आज वाढदिवस आहे. रेखा या वैयक्तिक आयुष्यामुळे ही बऱ्याच दिवस चर्चेत होत्या. त्यांच्या आयुष्यातील हा एक किस्सा.

Updated: Oct 10, 2022, 05:29 PM IST
अमिताभ यांच्याबाबत रेखा यांनी दिले होते हे स्पष्ट उत्तर, ऐकूण सर्वांनाच बसला होता धक्का title=

Rekha and Amitabh : बॉलीवुड अभिनेत्री  'भानुरेखा गणेशन' म्हणजेच 'रेखा' (Actress Rekha) या आज आपला 68वा वाढदिवस साजरा करत आहेत. 10 ऑक्टोबर 1954 रोजी चेन्नई येथे त्यांचा जन्म झाला. रेखा यांनी आपल्या अभिनयाने जगभरात चाहते कमावले. हिंदी सिनेमात त्यांचं नाव आज मोठ्या कलाकारांमध्ये येतं. रेखा या आपल्या वैयक्तिक आयुष्यात ही बऱ्याचदा चर्चेत राहिल्या. अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांच्यासोबतच्या नात्याबाबत ही अनेक चर्चा तेव्हा रंगल्या होत्या.  पण आजही लोकांच्या मनात हीच जोडी घर करुन आहे. अमिताभ यांच्यासह रेखा यांचं नाव नेहमीच चर्चेत राहिलं. (Amitabh Bachchan And Rekha Love Story)

 

रेखा आणि अमिताभ बच्चन यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री (Amitabh Bachchan And Rekha Chemestry) लोकांना आवडायची. 'दो अंजाने' सिनेमाच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली. 70 च्या दशकात रेखा आणि अमिताभ बच्चन मॅगझिन आणि वृत्तपत्रांमध्ये देखील झळकत होते. जे त्यांच्यावर प्रेम करत नाहीत. मग मी का नकार देऊ.'

रेखा म्हणाल्या होत्या की, जगभरातून प्रेम घ्या आणि त्यात आणखी प्रेम मिसळवून द्या. माझ्या मनात त्या व्यक्तीसाठी भावना आहे.

अमिताभ दीवार सिनेमानंतर सुपरस्टार बनले होते. त्यांच्यासोबत काम करताना त्या नव्हर्स फील करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं. रेखा आणि अमिताभ यांनी 'सुहाग', 'मुकद्दर का सिंकदर', 'मिस्टर नटवरलाल' आणि 'सिलसिला' सारख्या सुपरहीट सिनेमांमध्ये काम केले होते. पण आज दोघे ही एकमेकांपासून अंतर ठेवताना दिसतात.