...म्हणून महेश भट्ट यांना परवीन बाबीसोबत नातं संपवावं लागलं

निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत परवीन बाबीसोबतच्या नात्याचा खुलासा केला. एकेकाळी परवीनच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या महेशना काही कारणाने परवीन सोबतच्या नात्याला पूर्णविराम द्यावा लागला होता.    

Updated: Jun 15, 2024, 06:25 PM IST
...म्हणून महेश भट्ट यांना परवीन बाबीसोबत नातं संपवावं लागलं  title=

बॉलीवूड कलाकार हे सिनेमाव्यतिरीक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे जास्त चर्चेत राहतात.  आपल्या अभिनयासोबच बोल्ड अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे परवीन बाबी. काला पत्थर, दिवार अशा अनेक सिनेमातून परवीन बाबीने मुख्य भुमिका साकारली. एके काळी बॉलिवूड प्रसिद्ध असेलेली ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील तितकीच चर्चेत असायची.

निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट आणि परवीन बाबी हे अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. याबाबत महेश भट्टने अनेकदा खुलासा केला. अलिकडेच महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत परवीन बाबी आणि त्यांच्या नातेसंबंधाबद्दल सांगितलं आहे. महेश भट्ट म्हणाले की, 70 च्या दशकात परवीन बाबीसोबत मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो. तिच्यावरच्या प्रेमासाठी मी माझी पत्नी आणि माझी मुलगी पूजा यांना सोडून लांब राहत होतो. काही दिवसाने आमच्यात वाद होऊ लागले आणि आम्ही कायमचे वेगळे झालो. 

70 च्या दशकात परवीन बाबीने अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केलं. मात्र महेश भट्टसोबतचं नातं तुटल्यानंतर परवीन नैराश्यात गेली.या सगळ्याचा तिला मानसिक त्रास झाला. त्यामुळे परवीनवर मानसिक उपचार करण्यात येत होते. महेश यांनी पुढे असंही सांगीतलं की,  'शान' सिनेमाच्या शुटींग दरम्यान परवीनला मेंटल डिसऑर्डर झाल्याचं लक्षात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी तिला शॉक देण्याचं ठरवलं होतं.  मात्र या सगळ्याला माझा विरोध होता. तिच्या या आजारपणात मला तिच्या सोबत राहायचं होतं,मात्र मला माझ्या मित्राने परवीनला न भेटण्याचा सल्ला दिला. परवीनच्या या अवस्थेला मी च जबाबदार होतो. त्यामुळे माझ्या मित्राने मला सांगितलं की, 'जर तू तिच्यावर खरच प्रेम करत असशील तर तिला सोडून दे'. त्यानंर मी पुन्हा कधीच परवीनला भेटलो नाही. या सगळ्याला बऱ्याच वर्षांचा लोटला, तरी ही आज बाबीसोबतच्या नात्यांबद्दल सांगताना निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट हे भावूक झाले होते.