'कंगनाला फक्त कानशिलातच लगावली' स्वरा भास्करने 'थप्पड कांड'वर सोडलं मौन

Swara Bhasker On Kangana Ranaut : लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर दिल्लीला जाताना चंदीगड विमानतळावर कंगना रनौतला महिला सुरक्षा रक्षकाने कानशिलात लगावली. कुलविंदर कौर असं या महिला सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. यावर आता अभिनेत्री स्वरा भास्करने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 15, 2024, 05:58 PM IST
'कंगनाला फक्त कानशिलातच लगावली' स्वरा भास्करने 'थप्पड कांड'वर सोडलं मौन title=

Swara Bhasker On Kangana Ranaut : हिमाचल प्रदेशमधल्या मंडी लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत (Kangana Ranaut) हिला चंदीगड विमानतळावर (Chandigadh Aiport) महिला सुरक्षा रक्षकाने कानशिलात लगावली. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. महिला सुरक्षा रक्षक कुलविंदर कौरला (Kulvinder Kaur) निलंबित करण्यात आलं असून तिची उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे. याप्रकरणी आता अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhasker) पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. कंगना रनौतबरोबर जे झालं ते चुकीचं असल्याचं स्वरा भास्करने म्हटलंय. कंगनाला केवळ कानशिलात लगावली, सुदैवाने तिचा जीव सुरक्षित आहे, या देशा अनेकांचा मॉब लिचिंगमध्ये जीव गेलाय असं स्वरा भास्करने म्हटलंय.

कंगनाबरोबर चुकीचं घडलं
कोणीही समझदार व्यक्ती कंगनाबरोबर जे घडलं ते चुकीच होतं अशीच प्रतिक्रिया व्यक्त करेल. असा कोणीही नसेल जो या कृत्याचं समर्थन करेल. असं कोणाला मारणं चुकीचं असल्याचं स्वराने म्हटलंय. कंगनाला केवळ कानशिलात लगावण्यात आली. तिचा जीव सुरक्षित आहे. शिवाय कंगनाभोवती सुरक्षेचं कडंही आहे. पण देशात अनेकांनी जीव गमावला आहे. मॉब लिचिंगमध्ये अनेकांची हत्या करण्यात आलीय. सुरक्षा रक्षकचं लोकांना मारहाण करत असल्याची दृष्य कॅमेरात कैद झाली आहेत. या गोष्टीचं जे समर्थन करतात, त्यांनी कंगना प्रकरणावर आम्हाला शिकवण्याची गरज नसल्याचंही स्वरा भास्करने सांगितलं.

स्वराचा कंगनावर निशाणा
स्वरा भास्करने कंगना रनौतवर निशाणा साधला आहे. कंगनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हिंसाचाराचे समर्थन केलं आहे. स्वराने कंगनाच्या जुन्या वादग्रस्त ट्विटचाही उल्लेख केला. आहे. हॉलिवूड अभिनेता विल स्मिथच्या थप्पड प्रकरणावर कंगनाच्या प्रतिक्रियेचाही तीने आठवण करुन दिली. कंगनाबरोबर जे झालं ते चुकीचं आहे आणि ज्याने हे कृत्य केलं तिला निलंबित करण्यात आलं आहे, असं स्वरा भास्करने म्हटलंय.

कंगना-स्वराचं एकत्रित काम
कंगना रनौत आणि स्वरा भास्करने 2011 मध्ये तनू वेड्स मनू, 2015 मध्ये आलेल्या तनू वेड्स मनू रिटर्न्समध्ये एकत्र काम केलंय.

कुलविंदर कौरविरोधात गुन्हा दाखल
कंगना रनौतला कानशिलात लगाणाऱ्या महिला सुरक्षा रक्षक कुलविंदर कौरविरोधात गुन्हा दाखण्यात आला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावेळी कंगना रनौतने एक वक्तव्य केलं होतं. दिल्लीत शेतकरी 100-200 रुपये घेऊन आंदोलनाला बसले आहेत, असं कंगनाने म्हटलं होतं. या वक्तव्याचा संताप कुलविंदर कौरच्या मनात होता. कारण कुलविंदर कौरची आई देखील या आंदोलनात सहभागी झाली होती.