सलग 7 अर्धशतकं, 4 विश्वचषकांमध्ये कर्णधारपद आणि बरंच काही... भारतीय क्रिकेटमध्ये कोणाचा डंका?

सर्वात कमी वयात कसोटी सामन्यांमध्ये 200 धावा करण्याची किमया... 

Updated: Mar 21, 2022, 05:11 PM IST
सलग 7 अर्धशतकं, 4 विश्वचषकांमध्ये कर्णधारपद आणि बरंच काही... भारतीय क्रिकेटमध्ये कोणाचा डंका?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वामध्ये सध्या रंगत येत आहे ती म्हणजे येऊ घातलेल्या IPL 2022 ची. देशविदेशातील खेळाडू आणि त्यांचे संघ क्रिकेटच्या या महाकुंभात कशी कामगिरी करतात याकडेच क्रीडारसिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

असं असतानाच एका दमदार क्रिकेटपटूची एंट्री झालीये. सलग 7 अर्धशतकं, सर्वात कमी वयात कसोटी द्विशतक आणि 4 विश्वचषकांमध्ये संघाचं कर्णधारपद अशी चौफेर कामगिरी करणाऱ्या या खेळाडूनं संपूर्ण क्रिकेट विश्वाला हादरा दिला. 

धोनी आणि विराटला टक्कर देत पुरुषी मक्तेदारी असणाऱ्या या खेळात नावलौकिक मिळवणारा हा चेहरा आहे मिताली राज हिचा. (Mithali Raj)

भारतीय महिला क्रिकेटमध्ये मिथालीनं केलेली कामगिरी आणि तिच्या खेळातील सातत्य पाहता मिथाली कोणासाठी आदर्शस्थानी असल्यास त्यात नवल वाटण्याचं कारण नाही. 

मिथालीच्या आतापर्तंयच्या क्रिकेट कारकिर्दीवर आणि तिच्या आतापर्यंतच्या जीवनप्रवासावर बॉलिवूडमध्ये एक चित्रपट साकारण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू हिनं ऑनस्क्रीन मिताली साकारली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

Shabaash Mithu 'शाब्बाश मितू' या तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. जिथं क्रिकेट समालोचकांचं समालोचन सुरु असतानाच मितालीच्या भूमिकेत तापसी खेळपट्टीवर आल्याचं दिसतं. 

अवघ्या काही सेकंदांच्या या टीझरमधून तापसीचा मिताली लूक फारसा समोर आला नसला तरीही त्याची उत्सुकता मात्र आता शिगेला पोहोचली आहे.