सिनेमांपासून दूर असणारी राणी मुखर्जी आज करोडोंची मालकीण कशी?

राणीने गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले आहे.

Updated: Mar 21, 2022, 04:24 PM IST
 सिनेमांपासून दूर असणारी राणी मुखर्जी आज करोडोंची मालकीण कशी? title=

मुंबई :  अभिनेत्री राणी मुखर्जी ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरदार स्वत:चं वेगळ अस्तित्व निर्माण केलं आहे.

राणीच्या हिट चित्रपटांमुळे आणि उत्कृष्ट अभिनयामुळे ती बॉलीवूडच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्य अभिनेत्रींमध्ये सामील झाली. राणीने गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले आहे.

ती आता काही मोजक्याच सिनेमांमध्ये काम करते, पण तरीही ती जबरदस्त कमाई करत आहे. सिनेमापासून दूर असलेल्या या अभिनेत्रीची एकूण संपत्ती अनेकांना हादरवणारी आहे. 

राणी मुखर्जीच्या लाईफस्टाईल बद्दल बोलायचं झालं, तर तिच्याकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. ज्यात ऑडी A8 W12, मर्सिडीज बेंझ ई क्लास आणि मर्सिडीज एस क्लास यांचा समावेश आहे. या वाहनांची किंमत करोडोंच्या घरात आहे. 

राणी पती आदित्यसोबत राहत असली तरी अभिनेत्रीने स्वत:च वेगळ घर देखील घेतलं आहे. राणीने मुंबई आणि इतर अनेक ठिकाणी प्रोपर्टीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. तिने केलेल्या गुंतवणूकीमुळे आज तिच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. 

2021 च्या अहवालानुसार, सध्या सिनेमात फार कमी दिसणाऱ्या राणीची एकूण संपत्ती 90 कोटी एवढी असल्याचं बोललं जात आहे.