फुकटात लेहंगा मागणारी अभिनेत्री आता लग्नाआधीच करतेय डोहाळे जेवणाची तयारी?

Surbhi Chandna : सुरभि चंदना काही दिवसांपूर्वी स्वत: च्या लग्नासाठी डिझायनरकडून फुकटात कपडे मागितल्याच्या कारणामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आता तिनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरून तिनं लग्न आधीच डोहाळे जेवणाची तयारी सुरु केल्याचे म्हटले जाते. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 5, 2024, 02:37 PM IST
फुकटात लेहंगा मागणारी अभिनेत्री आता लग्नाआधीच करतेय डोहाळे जेवणाची तयारी? title=
(Photo Credit : Social Media)

Surbhi Chandna : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सुरभि चंदना गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिच्या लग्नासाठी तिच्या स्टायलिस्टनं एका डिझायनरकडून फुकटात कपडे मागितले. त्याची माहिती स्वत: त्या दिग्दर्शकानं दिली असून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु असताना. दुसरीकडे आता सुरभि सोशल मीडियावर चर्चेत येण्याचं कारण हे वेगळंच आहे. सुरभि चंदनानं शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. लवकरच लग्न बंधनात अडकणार असून तिनं डोहाळे कार्यक्रमाची देखील तयारी सुरु केली आहे. ही गोष्ट सुरभिनं तिची मैत्रिण नेहालक्ष्मी अय्यरच्या बॅचलर पार्टीचे फोटो शेअर करत सांगितली. नेहालक्ष्मीला लोक 

आता नेहालक्ष्मी विषयी बोलायचे झाले तर ती 22 फेब्रुवारी रोजी बॉयफ्रेंड रुद्रांश जोशिलसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. त्याआधी तिनं एका स्पिनस्टर पार्टीचे आयोजन केलं होतं. सुरभिनं याच पार्टीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत ती गर्ल गॅंगसोबत कशी मस्ती करते ते दाखवलं आहे. या पार्टीसाठी ड्रेस कोड पिंक ठेवण्यात आला होता. नेहानं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिच्यासोबत तिचा होणार नवरा रुद्रांशनं देखील काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. सुरभिनं या पार्टीतील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुरभिनं हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत कॅप्शन लिहिलं की 'आमच्या ग्रुपमधील सेकेंड लास्ट लग्न नेहालक्ष्मीचं आहे. याचं सेलिब्रेशन करण्यासाठी संपूर्ण रात्र फक्त प्रेम, वेड्या सारखं हसणं, मध्येच रडणं, डान्स फ्लोअरवर धम्माल करणं. सेलिब्रेशनसाठी शॉट्स. एकमेकांना देण्यात येणाऱ्या शुभेच्छा. या ग्रुपला कायम ठेवण्यासाठी आम्ही खूप मेहनत आणि प्रयत्न केले. या बॉन्डसाठी ते सगळ्यात महत्त्वाचं होतं. नोट - लग्नानंतर एकमेकांच्या डोहाळे कार्यक्रमात सहाभागी होऊ.'

हेही वाचा : सलमान खान होता अभिषेक आणि ऐश्वर्या रायचा प्रेमदूत? जुना व्हिडीओ होतोय Viral

सुरभिनं शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'मला ही गॅंग खूप आवडते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुम्ही प्रत्येकवेळी हे सिद्ध करतात की ही मैत्री कधी तुटणार नाही.' सुरभिच्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला होणार आहे. ते दोघं गेल्या 13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.