श्रद्धा कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत? सोशल मिडीया पोस्टमधून दिले संकेत

Shraddha Kapoor Marraige:  श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यानंतर तिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. 

Updated: Feb 5, 2024, 04:08 PM IST
श्रद्धा कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत? सोशल मिडीया पोस्टमधून दिले संकेत  title=

Shraddha Kapoor Marraige:  बॉलिवूडची आरोही म्हणजेच अभिनेत्री श्रद्धा कपूर ही कायमच सोशल मिडीयावर चर्चेत असते. नुकतीच श्रद्धाने टाकलेल्या एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. श्रद्धा सोशल मिडीयाच्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या कारणाने सक्रीय असते. श्रद्धाने इंस्टाग्रामवर पारंपारिक लुकमधले फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनवरुन श्रद्धा लवकरच लग्न करतेय का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

 
...तर लग्न करू का? 
श्रद्धा तिच्या लूकमुळे कायम चर्चेत असते. मराठमोळी नऊवारी आणि त्यावर नथ तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला होता. तिच्या साध्या आणि पारंपारिक लूकमुळे ती अनेक हृदयांवर राज्य करते. सध्या सोशल मीडियाच्यावर टाकलेल्या फोटोमध्ये फिकट गुलाबी रंगाचा पारंपारिक पोशाख आणि कानात घातलेल्या सोनेरी रंगाचे झुमक्यांमुळे तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसतय.  तिच्या साध्या लुकने नेटकऱ्यांना चांगलीच भुरळ घातली.  
तिने पोस्ट केलेल्या फोटोवर तिच्या चाहत्यांनी तिचं खूपच कौतुक केलंय. याशिवाय श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूर, गायक दर्शन रावल आणि अनेक बॉलिवूडच्या कलाकरांनी देखिल कमेंट करत तिचे कौतुक केलंय. श्रद्धाचे हे फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाले आहे. पण या फोटोला दिलेलं कॅप्शनमुळे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके चुकले आहेत. श्रद्धाने लिहिलं की, मी छान दिसतेय, तर लग्न करू का ? असा प्रश्न थेट चाहत्यांनाच विचारलाल. त्यामुळे श्रद्धा लग्न करणार आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shraddha  (shraddhakapoor)

सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ आणि श्रद्धा चार वर्ष रीलेशनशिपमध्ये होते. दोघांनी त्यांचं नातं का संपवलं याचं कारण त्यांनी कधीच मिडीयामध्ये सांगितलं नाही.अखेर फेब्रुवारी 2022मध्ये त्यांचा ब्रेकअप झालं असं म्हटलं जातं. 

 
'या' चित्रपटात झळकणार श्रद्धा!
तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर चंदू चॅम्पियन या सिनेमात ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  चंदू चॅम्पियन  सिनेमामध्ये तिच्यासोबत कार्तिक आर्यन दिसणार आहे.  त्यामुळे तिच्या चाहत्यांना येत्या जूनमध्ये श्रद्धा आणि कार्तिक यांची पडद्यावरील केमिस्ट्री अनुभवता येणार आहे. याशिवाय स्त्री या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच रिलीज होणार आहे. स्त्री या कॉमेडी हॉरर सिनेमाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली होती. तसंच अनुराग बासुच्या आगामी सिनेमात श्रद्धाचे कास्टींग होणार असल्याची चर्चा आहे.