या अभिनेत्याला शर्टलेस पाहून स्वतःला रोखू शकली नाही सुहाना खान, केलं हे काम

पुन्हा एकदा सुहाना खानच्या नावाची चर्चा 

Updated: Jan 11, 2022, 09:22 AM IST
या अभिनेत्याला शर्टलेस पाहून स्वतःला रोखू शकली नाही सुहाना खान, केलं हे काम  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची मुलगी सध्या आपल्या खासगी लाईफमुळे खूप चर्चेत आहे. असं असताना आता तिने अभिनेत्याच्या बोल्डनेसवर सुहाना फिदा झाली आहे. याचीच आता सगळीकडे चर्चा आहे. 

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) खूप फिटनेस फ्रीक आहे. उत्कृष्ठ शरीर कमावलेल्या टायगरने खूप मेहनत केली आहे. अनेकदा तो आपले वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते आहे. 

आता त्याने आपले काही फोटो शेअर केले आहेत. यावर शाहरूख खानची मुलगी सुहाना खान खूप फिदा झाली आहे. तिने टायगर श्रॉफच्या फोटोवर कमेंट केली आहे. 

टायगर श्रॉफने इन्स्टाग्रामवर त्याचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो शर्टलेस होऊन आरशासमोर सेल्फी घेताना दिसत आहे. त्याने टोपी आणि सनग्लासेस घातला आहे. यासोबतच त्याने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने लिहिले, उधार घेतलेली टोपी गोंडस दिसत होती, परंतु कदाचित हटविली जाईल.

शाहरूखच्या मुलीला आवडला अंदाज 

टायगर श्रॉफच्या या फोटोवर सेलेब्स प्रतिक्रिया देत आहेत. दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर अहमद खान यांनी लिहिले, हटवू नका. तो खरोखरच गोंडस आहे. टायगर श्रॉफचे हे फोटो पाहून शाहरुख खानची मुलगी सुहाना खानही स्वतःला रोखू शकली नाही. तिने पोस्ट लाइक केली. याशिवाय चंकी पांडे, मनीष मल्होत्रा ​​आणि इतर अनेक स्टार्सनी टायगरचे फोटो लाइक केले आहेत.

टायगर श्रॉफचे सिनेमे 

टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो तारा सुतारियासोबत 'हिरोपंती 2' या चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच टायगरने घोषणा केली होती की हा चित्रपट 2022 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय टायगर श्रॉफचा 'गणपथ' हा चित्रपट असून त्यात त्याच्यासोबत क्रिती सेनन दिसणार आहे. हा चित्रपट 24 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.