अवकाश, ग्रह, गणित आणि बरंच काही; थक्क व्हाल अशा गोष्टींमध्ये रमायचा सुशांत सिंह राजपूत, पाहा...

आज दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा 39वा वाढदिवस आहे. 21 जानेवारी 1986 रोजी बिहारमधील पटना येथे जन्मलेला सुशांत आज आपल्यात नसला तरी त्याची छाप चाहत्यांच्या हृदयात कायम राहिली आहे. 2020 मध्ये मुंबईत त्याने आपले जीवन संपवले, परंतु त्याच्या अभिनय, कष्ट आणि प्रेरणादायक कार्याने तो आजही आपल्या आठवणींमध्ये जिवंत आहे. 

Intern | Updated: Jan 21, 2025, 11:47 AM IST
अवकाश, ग्रह, गणित आणि बरंच काही; थक्क व्हाल अशा गोष्टींमध्ये रमायचा सुशांत सिंह राजपूत, पाहा... title=

आज आपण सुशांतच्या जीवनाशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊयात, ज्याबद्दल आपल्याला कदाचित माहिती नसेल. सुशांत सिंह राजपूतने आपल्या करिअरची सुरुवात 2008 मध्ये 'किस देश में है मेरा दिल' या मालिकेने केली होती, जिथे तो दुसऱ्या प्रमुख भूमिकेत होता. परंतु, त्याला प्रसिद्धी 2009 मध्ये 'पवित्र रिश्ता' या टीव्ही मालिकेने दिले, जिथे त्याने 'मानव' या पात्राची भूमिका साकारली. ह्या मालिकेने त्याला घराघरात प्रसिद्ध केले. तो एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून सिद्ध झाला आणि त्याने मोठ्या प्रमाणावर चाहत्यांची मने जिंकली. पुढे तो बॉलिवूडमध्ये यशस्वी झाला आणि 'एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'काई पो चे!', 'छिछोरे' यासारख्या चित्रपटांमध्ये चमकला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

चित्रपटगृहात चेहरा लपवून जाण्याचे कारण
सुशांत सिंह राजपूत एक अजब व्यक्तिमत्व होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो चित्रपटगृहात जात असे, पण तो तिथे आपला चेहरा लपवून जात असे. त्याला असे वाटायचं की चित्रपट सुरु होण्याआधी त्याच्या चेहऱ्याने कोणी ओळखले नाही पाहिजे. तो चित्रपटगृहात आपल्या प्रसिद्धीपासून दूर राहून फक्त चित्रपट पाहणारा सामान्य प्रेक्षक बनायचा. परंतु चित्रपट संपल्यानंतर त्याला प्रेक्षकांशी संवाद साधण्यात आनंद मिळायचा आणि तो प्रेक्षकांशी जास्ती खुल्या संवादात असायचा.

बॅकग्राउंड डान्सर म्हणून करिअरची सुरूवात
सुशांत सिंह राजपूतचा एक अज्ञात पैलू म्हणजे त्याचे बॅकग्राउंड डान्सर म्हणून करिअर. त्याला नृत्याची विशेष आवड होती आणि त्याने 'धूम 2' चित्रपटाच्या गाण्यात हृतिक रोशनसोबत बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले. कथ्थक, हिप-हॉप आणि बरेच नृत्यशास्त्र त्याला आवडत होते. त्याच्या नृत्यकौशलामुळे त्याला अनेक नृत्यदिग्दर्शकांकडून कौतुक मिळालं.

अमेरिकन सुपरमॉडेल केंडल जेनरसोबत फोटोशूट

सुशांत सिंह राजपूतची शैली आणि व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक होते आणि त्याचा ग्लॅमरस भाग देखील एक मोठा भाग होता. 2017 मध्ये, सुशांतने अमेरिकन सुपरमॉडेल केंडल जेनरसोबत एक प्रसिद्ध फोटोशूट केले. हे फोटोशूट 'व्होग' मासिकाच्या मे 2017 च्या आवृत्तीत प्रकाशित झाले होते. सुशांतच्या या ग्लॅमरस आणि प्रफेशनल फोटोग्राफीमध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाचा वेगळाच आलंब होता, जो त्याच्या चाहत्यांना खूप आवडला.

हे ही वाचा: बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक जीवन सफर; आजारामुळे गमवला जीव

खगोलशास्त्र आणि अभ्यासाची आवड 
सुशांत सिंह राजपूतला खगोलशास्त्रात खूप रस होता. त्याच्या व्यक्तिगत जीवनात तारे आणि ग्रहांची गती, अंतराळातील रहस्ये याबद्दल सखोल विचार करणे त्याला आवडत होते.  त्याच्या घरी दुर्बीणही होती. सुशांतला ॲस्ट्रोफिजिक्समध्ये किती रस आहे याबद्दल त्याच्या सहकलाकारांनीही चर्चा केली. शिवाय, सुशांतच्या नावाखाली चंद्राच्या जमिनीचा तुकडा नोंदवला गेला होता. बॉलिवूडमध्ये शाहरुख खानकडेही चंद्राचा काही तुकडा आहे. सुशांतने नॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाडही  जिंकले आहे. त्याने दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. 

सुशांत सिंह राजपूत हे एक अत्यंत प्रेरणादायक व्यक्तिमत्व होते, ज्याने प्रत्येक गोष्टीला प्रचंड कष्ट, समर्पण आणि प्रेमाने स्वीकारले. त्याच्या कामांमुळे तो अजूनही अनेकांच्या हृदयात जिवंत आहे.