मुंबई : अभिनेता सोनू सूद हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी आहे. आज सोनू सूद त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनूचा जन्म पंजाबमधील मोगा येथे झाला. सोनू सूदनं बहुतेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती पण करोनाच्या काळात तो खरा हीरो म्हणून समोर आला. महामारीच्या काळात त्यानं त्यांच्या टीमसोबत मिळून लोकांनची मदत केली. सोनू सूदनं 'कल्लाझागर' या तमिळ चित्रपटातून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. तो जेव्हा मुंबईत आला तेव्हा त्यानं फक्त 5000 रुपये आणले होते. मात्र आज तो कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे.
सोनू सूदनं चित्रपटसृष्टीत जवळपास २१ वर्षे पूर्ण केली आहेत. या अभिनेत्यानं आज इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता सोनू सूदची एकूण संपत्ती 130 कोटी रुपये आहे. सोनू सूद एका चित्रपटासाठी 2 ते 3 कोटी रुपये घेतो. अभिनेता सोनू सूदचं देखील एक प्रोडक्शन हाऊस आहे, ज्यातून तो चांगली कमाई करतो.
सोनू सूद मुंबईत लक्झरी लाइफ जगतो. त्याचे मुंबईत आलिशान घर आहे. सोनूचं 4 बीएचके घर आहे. त्याचे मुंबईत आणखी दोन अपार्टमेंट आहेत. एवढंच नाही तर त्याचे मुंबईतील जुहू येथे एक आलिशान हॉटेल आहे. या सगळ्याशिवाय सोनू सूदला गाड्यांचीही खूप आवड आहे. आलिशान घरासोबतच त्याच्याकडे गाड्यांचंही मोठं कलेक्शन आहे. सोनूकडे मर्सिडीज बेंझ एमएल क्लास 350 सीडीआय आणि ऑडी क्यू7 सारख्या लक्झरी कार आहेत. सोनूकडे पोर्श पनामा देखील आहे, ज्याची किंमत 2 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
दरमायन, सोनूनं 'शहीद-ए-आझम' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात सोनू सूदनं भगतसिंगची भूमिका साकारली होती, ज्याचे खूप कौतुक झाले होते. सोनू सूदनं 'आशिक बनाया आपने', 'जोधा अकबर', 'दबंग', 'सिम्बा', 'आर राजकुमार' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'दबंग' चित्रपटातील छेदी सिंग या त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते.