Alia Bhatt ने चोरला ब्लेझर, फोटोशूट करून सांगितलं गुपित

आलिया भटने नेमका कोणाचा चोरला ब्लेझर ? चोरी केल्यावर म्हणते...!

Updated: Jul 30, 2022, 12:34 PM IST
Alia Bhatt ने चोरला ब्लेझर, फोटोशूट करून सांगितलं गुपित title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याची बायको आलिया भट्ट प्रेग्नेट आहे. या अवस्थेतही ती शुटींगमध्ये वस्त आहे. या दरम्यानचे तिचे काही फोटोही समोर आले होते. आता आलिया भट्टने ब्लेझर चोरी केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आलियाने ब्लेझर का चोरी केला व तिच्यावर अशी वेळ का आली असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. 

आलिया भट्ट सध्या तिच्या 'डार्लिंग' या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या प्रमोशनसाठी आलेल्या आलियाच्या लेटेस्ट लूक खुप चर्चेचा विषय ठरतोय. मात्र यावेळी तिने घातलेला ब्लेझर चोरीचा असल्याची माहीती आहे. विशेष म्हणजे आलियाचं तिच्या पोस्टमध्ये म्हणतेय, तिने चोरलेला ब्लेझर घातला आहे. या तिच्या पोस्टवर आता भन्नाच कमेंटस येत आहेत.  

पोस्टमध्ये काय? 
आलियाने काळ्या आणि राखाडी रंगाचा ड्रेस परिधान केलेले फोटो शेअर केले आहेत. या सुंदर सिक्विन ड्रेससोबत आलियाने ब्लॅक ओव्हरसाईज ब्लेझर घातला होता. या आउटफिटमधील तिचे फोटो शेअर करत आलियाने लिहिले की, 'नवरा बाहेर गेला असेल तर मी त्याचा ब्लेझर चोरून माझा लूक पूर्ण केला आहे. धन्यवाद माझ्या डार्लिंग.'

या फोटोत घातलेले ब्लेझर आलियाने काही चोरले नाही आहे. तर ते ब्लेझर रणबीर सिंहचे आहे. रणबीर बाहेर असल्याने तिने त्याचा ब्लेझर चोरून तिचा लुक पूर्ण करत असल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.  

दरम्यान चाहत्यांना आलियाचे हे फोटोशूट खूप आवडले आहे. एका यूजरने कमेंट केली, 'मग काय झालं? रणबीरनेही तुमचे हृदय चोरले आहे. दुसऱ्याने लिहिले, 'तू खूप सुंदर दिसत आहेस,अशा भन्नाट कमेंट चाहते करत आहेत.