मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली. देशभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त होत असताना अनेक बॉलिवूड मंडळींच्या प्रतिक्रिया समोर आल्या. नेहमीच वादाच्या चक्रव्युहात अडकणारी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरला पुन्हा नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. सोनमने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट केली आहे.तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियवर तीला ट्रोल केले जात आहे.
सोनम तिच्या पोस्टमध्ये म्हणते, 'मी कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात आहे. आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. कोणच्याही भावना न दुखवता आपण आपले मत मांडू शकतो. प्रत्येक धर्मात रूढी विचारांचे लोक राहतात. मी निष्पक्ष आहे आणि मी भारत आणि भारताच्या नैतिक मूल्यांचे आदर करते.'
तिच्या या ट्विट नंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे. एका युर्जरने तिच्या या ट्विटला प्रत्युत्तर देत आता तु आम्हाला देशभक्तीचे प्रमाणपत्र देणार का... तर दुसऱ्याने तिला स्वत:च्या हद्दीत राहण्याचा सल्ला दिला आहे.
सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अणि ट्विटर अकाउंटवर सोनम कपूर आहूजा हे नाव बदलून 'झोया सिंग सोलंकी' हे नाव ठेवले आहे. 'द झोया फॅक्टर' सिनेमाची कथा अनुजा चौहान लिखीत पुस्तकावर आधारित आहे. सिनेमाची कथा एका राजपूत मुलीच्या आयुष्या बेतलेली आहे. जिचे नाव झोया आहे आणि ती एका जाहीरात एजन्सीमध्ये कामाला आहे.