एनआरआय नवरा पाहिजे... घटस्फोटानंतर प्रसिद्ध गायिका विवाह बंधनात...

प्रसिद्ध गायिकेच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.   

Updated: May 21, 2022, 08:28 AM IST
एनआरआय नवरा पाहिजे... घटस्फोटानंतर प्रसिद्ध गायिका विवाह बंधनात... title=

मुंबई :  बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर पुन्हा लग्न बंधनात अडकली आहे. गुरुवारी कनिकाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असताना तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये कनिका आयुष्यातील खास क्षणांचा अनुभव घेताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कनिका 20 मे रोजी पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात केली. कनिका लंडनमधील एनआरआय बॉयफ्रेंड गौतम (Gautam Hathiramani) सोबत लग्न केलं आहे. मेहंदी सोहळ्या दरम्यान कनिका आणि गौतमचे काही फोटो व्हायरल झाले, ज्यामध्ये दोघे रोमँटिक होताना दिसले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कनिकाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'G  I Love you sooooo much!', असं लिहिलं आहे. सध्या कनिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

कनिका कपूरबद्दल सांगायचं झालं तर, तिचं हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न NRI उद्योगपती राज चंडौक यांच्याशी झाले होते. तो लंडनचा रहिवासी होता, पण राज आणि कनिकाने 2012 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. कनिका कपूरला पहिल्या लग्नापासून तीन मुले आहेत.