VIRAL VIDEO वरून शाहरुखच्या सुरक्षेची चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Shah Rukh Khan : शाहरुख खानचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी एक चिंता व्यक्त केली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 8, 2024, 07:23 PM IST
VIRAL VIDEO वरून शाहरुखच्या सुरक्षेची चाहत्यांनी व्यक्त केली चिंता title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan : शाहरुख खानचा मुलगा अबराम आणि आर्यनसोबत फुटबॉल खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत  शाहरुख खान 'मन्नत'मध्ये त्याचा मुलगा अबराम आणि आर्यनसोबत फुटबॉल खेळताना दिसला होता,  शाहरुख मन्नतमध्ये बांधलेल्या मैदानात त्याच्या  फुटबॉल खेळताना दिसला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते खूश झाले पण गुप्तपणे केलेल्या रेकॉर्डिंगवर चिंता व्यक्त केली जात आहे. 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. मात्र या सर्वांमध्ये किंग खानच्या सिक्युरिटीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. शाहरुख खान अबराम आणि आर्यनसोबत मन्नतमध्ये फुटबॉल खेळतानाचा हा व्हिडिओ कुणीतरी टेरेसवरून लपूनछपून रेकॉर्ड करून इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख,अबराम किंवा आर्यन यांचे चेहेरे स्पष्ट दिसत नाहीत. मात्र, हा विडिओ कोणी यावर असा प्रश्न नेटकरी विचारत  आपली चिंता व्यक्त करत आहेत .

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका नेटकऱ्याने यावर लिहिले आहे की, 'व्हिडिओ जशा पद्धतीने रेकॉर्ड करण्यात आला आहे, ते पाहता रेकॉर्ड करणाऱ्याला प्रायव्हसीचा काळजी नसल्याचे दिसून येते.' दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, 'त्याने प्रायव्हसीचे उल्लंघन केले आहे .' अजून एका चाहत्याने लिहिले की, 'घर असे असेल तर  या ठिकाणी शाहरुख सरही वर्ल्ड कप देखील आयोजित करू शकतील 

शाहरुख खान  गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये रिलीज झालेल्या 'पठाण', 'जवान' आणि 'डँकी' या तीन चित्रपटांमध्ये झळकला होता. सध्या शाहरुखने कोणत्याही नवीन चित्रपटाची घोषणा केलेली नसली तरी एप्रिल किंवा मे महिन्यापासून सलमान खानसोबतच्या 'टाइग वर्सेस पठान' या चित्रपटाच्या  शूटिंगला सुरुवात करू शकतो, अशी चर्चा आहे.

हेही वाचा : 'लग्नानंतर मी शॉर्ट्समध्ये घरात फिरू शकत नव्हते, अनेक गोष्टी...; ईशा देओलने मांडली व्यथा

मन्नत हे बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबियांचे निवासस्थानाचे आहे. शाहरुख खानने 2001 मध्ये हे घर विकत घेतले होते.  वांद्रे परिसरात स्थित, मन्नत हे केवळ घरच नाही तर मुंबईतलं पर्यटनाचे एक महत्वाचे स्थान बनले आहे. या ठिकाणी शाहरुखचे चाहते शाहरुख ची झलक पाहण्यासाठी गर्दी करताना दिसतात.   त्याची एक झलक पाहण्याच्या आशेने बाहेर जमतात. शाहरुख खान वारंवार सोशल मीडियावर त्याच्या घराचे फोटो शेयर करताना दिसतो. मन्नत हे भारतातील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या निवासस्थानांपैकी एक आहे.