Sai Tamhankar: सई ताम्हणकर ही आजच्या घडीची सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगताना दिसते. तिचे फॅन फॉलोईंगही फार मोठे आहे. तिच्या फोटोंचीही फार मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली असते. तिचे हटके फोटोशूट पाहून तिचे चाहते घायाळच होतात. तिच्या रिलेशनशिपचीही अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळते. त्यामुळेही ती सतत चर्चेत असते. सध्या तिचा एक हटके व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या हटके व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये तिनं आपल्या जोडीदारबद्दलची अपेक्षा सांगितली आहे. त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिला एक प्रश्न विचारण्यात आला ज्यावर तिनं फार स्पष्टपणे उत्तर दिलेले आहे. तेव्हा पाहुया की ती नक्की काय म्हणाली आहे. हा व्हिडीओ 'झी मराठी'वरील 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमातील आहे.
सई आता फक्त मराठीपुरतीच नाही तर ती आता बॉलिवूडचीही अभिनेत्री झाली आहे. त्यामुळे तिची विशेष करून चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. तिला 'मिमी' या तिच्या लोकप्रिय चित्रपटासाठी 'आयफा' पुरस्कारही मिळाला आहे. मलिका, जाहिराती, वेबमालिका, चित्रपटांमध्ये सईचा हटके आणि बोल्ड अंदाज प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहतो. 'झी मराठी'वरील 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात सई ताम्हणकरनं नुकतीच हजेरी लावली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. अवधुत गुप्तेंसोबत तिनं हटके आणि मस्त गप्पा मारल्या. सोबतच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी सईनं फार प्रामाणिकपणे उत्तर दिली होती. त्यामुळे अनेकांनी तिचं कौतुकही केले आहे तेव्हा पाहुया नक्की तिनं या व्हिडीओतून आपल्या जोडीदाराबद्दलच्या कोणत्या अपेक्षा सांगितल्या आहेत.
हेही वाचा - महेश बाबूच्या सितारानंतर 'तारा' ठरली लकी, झळकली Times Sqaure वर! पाहा कोणाची आहे मुलगी?
यावेळी अवधुत गुप्ते यांनी सईला एक प्रश्न विचारला होता ज्यावर सईनं प्रामाणिक आणि परखड उत्तर दिलं आहे. अवधुत गुप्ते यांनी तिला विचारलं की, ''अनुरुप जोडी असण्यासाठी काही गुण जुळवावे लागतात. तुझ्यामते असा कोणता गुण आहे, जो तडजोड करणं अजिबात शक्य नाही”. त्यावर सई ताम्हणकरची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.
त्यावर सई म्हणते की, “स्वत: मध्ये स्वत्व ठेवून रिलेशनशिपमध्ये जगणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपून रिलेशनशिपमध्ये राहायला हवं. जी व्यक्ती स्वतःसोबत आपल्या जोडीदाराचेही स्वत्व जपते, अशी व्यक्ती जोडीदार असणं गरजेचे आहे.” असं ती म्हणाली आहे.