Karan Johar : बॉलिवूड निर्माता आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला मिळत असलेल्या यशाचा चित्रपटाची संपूर्ण टीम आनंद घेत आहे. हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाची टीम अजूनही प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, नुकतीच एक प्रेस कॉन्फरन्स झाली यावेळी त्यांनी चित्रपटातील एक सीन दाखवला आहे. ज्यात रॉकी म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग हा रानीची आई चुरनी गांगुली म्हणजेच आलियाची चित्रपटातील आईसाठी ब्रा च्या शॉपिंगसाठी जातो. त्यावर करण जोहरनं खुलासा केला आहे की तो देखील त्याच्या आईसाठी ब्रा खरेदी करतो. त्याला त्यात काहीच अडचण नाही. पण काही मित्रांना त्याचा त्रास होतो.
करण जोहर याविषयी बोलताना म्हणाला की 'हा कधीच टॅब असलेला विषय नव्हता. मी आईसाठी ब्रा खरेदी करण्यासाठी गेलो होतो आणि त्यात मला कधीच काही त्रास झाला नाही. पण मला याची कल्पना होती की जेव्हा मी असं केलं तेव्हा माझ्यासोबत असलेल्या इतरांना कळलंच नाही ते घाबरले की हा खरंच असं करतोय. तर हे काम मी माझ्या कोणत्या फीमेल फ्रेंड म्हणजे कोणत्या मैत्रिणीकडून का करून घेत नाही. तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की का? माझ्या आईनं स्वत: सांगितलं आहे तर मी या कामासाठी दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला का सांगू. जिथे जी गोष्ट आहे तिथे मला ती जाऊन खरेदी करावी लागते. जे तिला हवं ते. मग ती एक ब्रा असू शकते किंवा मग दुसरी कोणतीही गोष्ट.'
पुढे यावरून चित्रपटातील त्या सीनविषयी बोलताना करण म्हणाला, 'मला याची कल्पना आहे की अनेकांना चित्रपटात तो सीन पाहून अनक्मफर्टेबल वाटू शकतं. पण हाच माझा मुद्दा होता.'
करण जोहर पुढे म्हणाला की 'माझ्यासाठी तो सीन खूप ऑर्गॅनिक होता. कारण मला माहित होतं की त्याच्या आजुबाजूला एक डिस्कम्फर्ट होतं. त्यात चित्रपटात एक लाइन होती. ज्यात चुरनी म्हणजे, अनेक वर्षांपासून महिला पुरुषांचे अंतर्वस्त्र धुताता आणि तू एका ब्रा ला हात लावू शकत नाहीस? त्यावर देखील हेच होतं की लोक पाहतील तेव्हा त्याविषयी काय विचार करतील हे माहित होतं.'
हेही वाचा : The Rock Dwayne Johnson : जिममध्ये झोपणाऱ्या UFC फायटरला रॉकनं गिफ्ट केलं घर!
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर 28 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात आलिया भट्ट, रणवीर कपूर, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यावर नेटकऱ्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया देखील मिळत आहेत.