'मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान मिळतं...', रितेश देशमुखच्या 'त्या' वक्तव्यामुळे एकच खळबळ

रितेशनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Oct 14, 2022, 12:22 PM IST
'मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान मिळतं...', रितेश देशमुखच्या 'त्या' वक्तव्यामुळे एकच खळबळ title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. रितेश हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. रितेशनं आतापर्यंत अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. रितेशनं 'लय भारी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्याआधी रितेशनं 2013 मध्ये त्याने 'बालक पालक' आणि 'यलो' या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले होते. आता रितेश एक दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. यावेळी त्यानं 'वेड' या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रितेशनं मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर वक्तव्य केलं आहे. 

हेही वाचा : हृतिकनं शेअर केलेला 'तो' Photo पाहून नेटकरी म्हणतायत Love is in the air

रितेशनं नुकतीच पीटीआयला मुलाखत दिली होती. यावेळी रितेशनं दिग्दर्शनातील त्याच्या पदार्पणावर म्हणाला, 'मला दिग्दर्शन क्षेत्राचे अनेक वर्षांपासून आकर्षण होते. पण मी अभिनय करत असल्यामुळे ते करण्याचे धाडस मला नव्हतं. पण गेल्या तीन-चार वर्षांत मी ते करु शकतो का? मला ते जमेल का याबद्दल मी विचार केला. त्यानंतर मी वेड हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचे ठरवले,' असं रितेश म्हणाला. (riteish deshmukh speak about marathi movies survival with hindi movie) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी विषयी बोलताना म्हणाला, 'महाराष्ट्र राज्य चित्रपटसृष्टीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पण अनेक हिंदी चित्रपटसृष्टीच्या तुलनेत मराठी चित्रपटांना फार मोठा संघर्ष करावा लागतो. मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक पहिली पसंती देताना दिसतात. त्यामुळे एकाच राज्यात हिंदी चित्रपटांबरोबर स्पर्धेत टिकून राहणं हे मराठी चित्रपटासांठी फार कठीण आहे. अनेक चांगल्या मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान मिळत असल्यानं त्यांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही याचा परिणाम होतो.' 

हेही वाचा : 'कोणाला माझी काळजी नाही...', ऋषभ पंतवरून ट्रोल झाल्यावर उर्वशी रौतेलाचं दु: ख आलं समोर

पुढे रितेश म्हणाला, 'पण नागराज मंजुळेंचा सैराट, महेश मांजरेकरांना नटसम्राट यासारखे अनेक मराठी चित्रपट सुपरिहट झाले आहेत. प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यासाठी राज्याला दरवर्षी किमान दोन चांगले मराठी चित्रपट निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. मग आपण तिसऱ्या वरुन दुसऱ्या आणि दुसऱ्या वरुन समान पातळीवर कसे जाऊ शकतो याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. आपण प्रेक्षकांना कशाप्रकारे आकर्षित करु शकू याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. त्यातील 9 ते 10 कोटी प्रेक्षक हे मराठी भाषिक आहेत, असा मला ठाम विश्वास आहे,' असे रितेश देशमुख म्हणाला.

दरम्यान, 'वेड' या चित्रपटातून जिनिलिया देशमुख ही तब्बल 10 वर्षांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. जिनिलियासोबत या चित्रपटात लोकप्रिय अभिनेता अशोक सराफ दिसणार आहेत. तर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत बॉलिवूडचा भाईजान सलमान खान दिसणार आहेत. या पूर्वी जिनिलियाने हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल 5 भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय या चित्रपटात