विवस्त्र आंघोळ केल्यास आरोग्यासाठी अधिक फायदेशीर? डॉक्टरांनी सांगितलं रहस्य

Benefits of Bathing Without Clothes : अनेकांना विवस्त्र होऊन आंघोळ करायला आवडते तर काही लोक अंगावर एकतरी कपडा ठेवतात. पण विवस्त्र आंघोळ केल्याने आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. यामागील तथ्य डॉक्टरांनी सांगितलंय.   

नेहा चौधरी | Updated: Jan 24, 2025, 12:55 PM IST
विवस्त्र आंघोळ केल्यास आरोग्यासाठी अधिक फायदेशीर? डॉक्टरांनी सांगितलं रहस्य  title=

How To Take Shower For Better Health : शरीर स्वच्छा ठेवल्यास आपण निरोगी राहतो. शास्त्रात आणि वैज्ञानिकदृष्ट्या आंघोळ करण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, रात्री अंगावर एकही कपडा न घालता झोपल्यास आपल्या शरीराला आरोग्यदृष्टीकोनातून अनेक फायदे होतात. मग विवस्त्र आंघोळ केल्यासही आपल्याला आरोग्यास अधिक फायदा मिळतो का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत असतो. ऋतू कोणताही असो, लोकांनी रोज आंघोळ करावी, असं तज्ज्ञ सांगतात. लोक त्यांच्या सोयीनुसार आंघोळीसाठी थंड किंवा गरम पाणी वापरतात. अनेक लोक आंघोळ करताना शरीरावर कोणतेही कपडे घालत नाहीत, तर काही लोक अंतर्वस्त्रे किंवा काही कपडे घालून आंघोळ करतात. धार्मिक दृष्टिकोनातून विवस्त्र होऊन आंघोळ करणे चांगले मानले जात नाही. मात्र वैद्यकीय शास्त्राचा यावर काय दृष्टिकोन त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

विवस्त्र आंघोळ केल्यास आरोग्यासाठी अधिक फायदेशीर?

ज्युपिटर हॉस्पिटलचे त्वचाविज्ञानी डॉ. अमोघ वैशंपायन यांनी सांगितलं की, आंघोळीसाठी वैद्यकीय शास्त्रात कोणताही विशिष्ट नियम असा सांगण्यात आलेला नाही. लोक त्यांच्या इच्छेनुसार कपड्यांशिवाय आंघोळ करू शकतात आणि अंडरवेअर घालूनही आंघोळ केल्यास काही गैर नाही. पण जर एखाद्या व्यक्तीने कपड्यांशिवाय आंघोळ केली तर तो त्याच्या मांडीचा भाग चांगल्या प्रकारे स्वच्छ करू शकतो, कारण हे अंडरवेअर घालून आंघोळ करताना शक्य होत नाही. आंघोळ करताना लोकांनी आपली नाभी, मांडीचा भाग आणि बगले पूर्णपणे स्वच्छ करावी, कारण या ठिकाणी जास्त घाम येतो आणि बॅक्टेरिया जमा होतात.

त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, कपड्यांशिवाय आंघोळ केल्याने लोकांना त्यांचे संपूर्ण शरीर स्वच्छ करण्यात सोप जातं. शरीर उघडे न ठेवता आंघोळ करणे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतं, मात्र अंडरवेअर घालून आंघोळ केल्यानेही कोणतेही नुकसान होत नाही. कपड्यांशिवाय आंघोळ करण्याचे फायदे आहेत. मात्र लोकांनी आपल्या बाथरूमच्या स्वच्छतेची देखील काळजी घेणे एवढंच महत्त्वाच आहे. जर तुमच्या बाथरूममध्ये स्वच्छतेचा अभाव असेल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होण्याची भीती असते. कपड्यांशिवाय आंघोळ करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही, मात्र तुम्ही तुमच्या सोयीनुसार तसे करू शकता.

 

हेसुद्धा वाचा - आंघोळ विवस्त्र स्थितीत करू नये? शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

 

कपड्यांशिवाय झोपणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. काही अभ्यासांनी असा दावा केला आहे की, कपड्यांशिवाय झोपल्याने शरीराला नैसर्गिकरित्या श्वास घेण्याची संधी मिळते आणि त्वचेवर जास्त दबाव पडत नाही. याच्या मदतीने शरीराचे तापमान अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करता येते, ज्यामुळे गाढ आणि आरामदायी झोप मिळते. याशिवाय कपड्यांशिवाय आंघोळ केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. कपड्यांशिवाय झोपणे देखील हार्मोनल संतुलन सुधारू शकते. तरी डॉक्टर सहसा लोकांना असा सल्ला देत नाहीत.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)