tabu's love story: तब्बू ५३ वर्षांची असूनही आज सिंगल आहे. तब्बूने आपल्या अभिनयाने 'दृश्यम', 'माचिस', 'चांदनी बार' आणि 'हैदर' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, आजही अभिनय क्षेत्रात ती आपली छाप सोडत असते. परंतु तिचे प्रेम संबधात अपयशचं मिळतं आले आहे.
तब्बूचे पहिले प्रेम आणि त्यांचे ब्रेकअप: तब्बूचे पहिले प्रेम अभिनेता संजय कपूरसोबत होते. 1995 साली रिलीज झालेल्या 'प्रेम' चित्रपटात त्यांची जोडी पहिल्यांदाच दिसली होती आणि चित्रपटाच्या सेटवरच त्यांचे प्रेमदेखील बहरले. परंतु त्यांचे नातं लवकरच ब्रेकअपमध्ये बदलले. संजय कपूरने एका मुलाखतीत सांगितले की, 'चित्रपटाच्या सुरुवातीला मी तब्बूला डेट करत होतो, पण शेवटी आम्ही आमच्या नात्यातून बाहेर पडलो.'
तब्बूने आपल्या मुलाखतीत खुलासा केला की संजय कपूरने तिची फसवणूक केली होती, कारण त्याचे लक्ष महीप कपूरकडे होते. 'आम्ही एकत्र होतो तेव्हा संजयचे लक्ष महीपकडे होते,' असे ती म्हणाली. महीप कपूर आणि संजय यांचे नातेसंबंध खूप चर्चेत राहिले, खासकरून संजयने तब्बूसोबतच रिलेशनशिप तोडून महीपला पसंती दिली.
संजय कपूर आणि महीप कपूर: वन नाईट स्टँड आणि लग्न
महीप कपूरने एक खुलासा केला होता की, तिने संजय कपूरसोबत एक वन नाइट स्टँड अनुभवला होता. ती म्हणाली, 'हो, मी हे केले, पण मला त्यावेळी कल्पनाही नव्हती की तो माझ्या आयुष्यात इतका महत्त्वाचा होईल. तो नशेत होता आणि आम्ही एक पार्टीत भेटलो.' संजय आणि महीप कपूरने 1997 मध्ये लग्न केले.
हे ही वाचा: 19 वर्षांच्या राशा थडानीला आवडतो 40 वर्षांचा 'हा' विवाहीत अभिनेता
नागार्जुनसोबतचे रिलेशनशिप आणि ब्रेकअप
संजय कपूरनंतर, तब्बूचे नाव साऊथ सुपरस्टार नागार्जुनसोबत देखील जोडले गेले. त्यांनी 10 वर्षे एकमेकांना डेट केले, मात्र तब्बूला समजले की नागार्जुन आपल्या पत्नीला सोडणार नाही. म्हणूनच, अभिनेत्रीने त्यांच्याशी ब्रेकअप केले. यानंतर, साजिद नाडियाडवाला सोबत तिचे नाव जोडले गेले, परंतु साजिद आधीच विवाहित असल्यामुळे त्यांच्या नात्याला आकार मिळाला नाही.
तब्बूचे प्रेम आणि नातेसंबंध अनेकदा चर्चेचा विषय बनले आहेत आणि तिचे निर्णय आणि त्यातून आलेले ब्रेकअप आजही मीडिया आणि चाहत्यांच्या चर्चेत आहेत.