ही दोस्ती तुटायची नाय... रितेश देशमुख आणि अमित ठाकरे यांच्या मैत्रीचा खास

मैत्रीचं उत्तम उदाहरण म्हणजे रितेश देशमुख आणि अमित ठाकरे.. पाहा Video   

Updated: Sep 29, 2022, 09:25 AM IST
ही दोस्ती तुटायची नाय... रितेश देशमुख आणि अमित ठाकरे यांच्या मैत्रीचा खास  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत, जे त्यांच्या अभिनयामुळेच नाही तर, मैत्रीमुळे देखील ओळखले जातात. राजकारणात देखील असे राजकारणी आहेत, जे मैत्रीसाठी ओळखले जातात. पण एका अभिनेत्याची आणि राजकारणी व्यक्तीमध्ये असलेली मैत्री फार क्वचित पाहायला मिळते. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (amit thackeray) दिसत आहेत.  (riteish deshmukh and amit thackeray friendship)

व्हिडीओमध्ये दोघांमध्ये असलेली घट्ट मैत्री ( true friendship) दिसत आहे. रेड कार्पटवरील (red carpet) रितेश आणि अमित यांची मैत्री चर्चेचा विषय ठरत आहे. एका पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडीओ आहे. सध्या रितेश आणि अमित यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ....

या पुरस्कार सोहळ्यात आमित ठाकरे यांना मोस्ट स्टायलिश पॉलिटिशन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर रितेश देशमुख आणि जेनेलिया यांना 'पॉवर कपल' पुरस्कार देवून गौरवण्यात आलं.  (riteish-amit)

रितेश देशमुखबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. शिवाय रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया (Genelia d souza) देखील सोशल मीडियावर सक्रिय असेत. दोघांच्या इन्स्टाग्रामावरील व्हिडीओला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळतं. (riteish social media)