वडिलांच्या निधनानंतर रवीना टंडनचा मोठा निर्णय...

रवीना टंडनला का घ्यावा लागला मोठा निर्णय...  ज्यामुळे चर्चांना उधाण   

Updated: Feb 18, 2022, 12:59 PM IST
वडिलांच्या निधनानंतर रवीना टंडनचा मोठा निर्णय...  title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रवीना टंडनच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे सध्या रवीना कुटुंबासोबत दुःख विसरण्याचा प्रयत्न करत आहे. रवीना टंडनच्या वडिलांचं नाव रवी टंडन आहे. ते नर्माते होते. वडिलांच्या निधनानंतर खुद्द रवीनाने अंतसंस्काराच्या सर्व प्रक्रिया पार पाडल्या. या दरम्यानचे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रवीना तुफान चर्चेत आली. 

वडिलांच्या निधनानंतर तात्काळ रवीनाने मोठा निर्णय घेतला आहे. रवीनाने शुटिंग करण्यास सुरुवात केली आहे. सिनेमाच्या शुटिंगसाठी रवीना सेटवर पोहोचली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon)

वडिलांच्या निधनानंतर रवीनाने काम करण्यास सुरूवात केली आहे. निर्मात्यांचं नुकसान नको म्हणून रवीनाने वडिलांच्या निधनानंतर तात्काळ महत्त्वाचा निर्णय घेतला आणि काम करण्यास सुरुवात केली आहे. 

रवी टंडन यांचे शुक्रवारी पहाटे 4.45 च्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. रवीना टंडननेही तिच्या वडिलांचे फोटो शेअर करत वडिलांच्या निधनाची माहिची दिली. 

'लव्ह इन शिमला' आणि 'ये रास्ते हैं प्यार के' या सिनेमांमधून दिग्दर्शनातील बारकावे शिकल्यानंतर रवी टंडन यांनी दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा केला. त्या सिनेमाचं नाव होतं  'अनहोनी'. 

 'अनहोनी' सिनेमातील संजीव कुमार यांच्या अभिनयाचे आजही कौतुक होतं. यानंतर त्यांनी ऋषी कपूरसोबत 'खेल खेल में' आणि अक्षय कुमारसोबत  'खिलाडी' सिनेमाची निर्मिती केली.