मुंबई : 90च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक एकापेक्षा एक चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल झाले. पण प्रत्येक वेळा पडद्यावरची गोष्ट वेगळी असायची आणि पडद्यामागील गोष्टी फार कमी प्रमाणात सर्वांसमोर यायच्या. अशीच एक गोष्ट आहे अभिनेत्री रवीना टंडनबद्दल. जेव्हा 'मोहरा' चित्रपटातील 'टिप टिप बरसा' गाण्याचं चित्रीकरण सुरू होतं तेव्हा रवीनाने अभिनेता रणवीर सिंगला सेटमधून बाहेर जाण्यास सांगितलं होतं.
रणवीरने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे. जेव्हा रणवीरचे भावंड कॅनडामधून मुंबईत आले होते, तेव्हा त्यांनी अभिनेता अक्षय कुमारला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. रणवीरचे वडील उद्योगपती असल्यामुळे त्यांची ओळख काही दिग्दर्शकांसोबत होती. त्यामुळे अक्षयला भेटनं त्यांच्यासाठी सहज शक्य होतं.
काही क्षणामध्ये रणवीरच्या वडिलांना माहिती मिळाली. अक्षय 'टीप टीप बरसा' गाण्याची शुटिंग अभिनेत्री रविना टंडनसोबत करत आहे. तेव्हा रणवीर आणि परदेशातून आलेली त्याची भावंड अक्षय भेटण्यासाठी सेटवर पोहोचले. त्याठीकाणी रवीना पिवळ्या साडीत होती आणि तिचे केस ओले होते.
रवीनाचं ते सौंदर्य पाहुण सर्वचं घायाळ होत असतं, त्यामध्ये रणवीर सुद्धा रवीनाचं सौंदर्य पाहून घायाळ झाला. तेव्हा रवीनाच्या ही गोष्ट लक्षात आली आणि तिने रणवीरला बाहेर जाण्यास सांगितलं. तेव्हा रवीनाने रणवीरला बाहेर काढलं पण आज तो बॉलिवूडचा सुपर हिरो असून रणवीर आणि रविना आता चांगले मित्र आहेत.